मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगात तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण देश हे 2 गटात विभागले आहे. आतापर्यंत अनेकांचा जीव गेला, शहरं उद्ध्वस्त झाली. पण या परिस्थितीचा अंदाज अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी वर्तवला होता. बाबा वेंगाच्या भाकितांवर विश्वास ठेवला तर ही परिस्थिती तिसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरू शकते. साहजिकच, 2 महायुद्धांमुळे झालेल्या विध्वंसानंतर तिसऱ्या महायुद्धाची कल्पना देखील भयावह आहे कारण पुतिनकडून अणुबॉम्बच्या वापराचा धोका मानवजातीसाठी विनाशकारी ठरू शकतो. (Baba Vanga 2023 Prediction) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. यादरम्यान अनेक जागतिक नेत्यांनी तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली आहे. दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही अनेकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. या परिस्थितींमुळे बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खरी होण्याची शक्यता वाढते. बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवली होती. एवढंच नाही तर आणखी एक प्रसिद्ध भविष्‍यवेत्‍ता नॉस्ट्राडेमस यांनीही तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे. (baba vanga prediction on third world war 2023 list and effect )


महायुद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील 


वृत्तानुसार, जर तिसरे युद्ध घडले तर पृथ्वीचे मानवजातीचे मोठे नुकसान होईल. कदाचित मनुष्याचा नाश होईल. एकीकडे पृथ्वीवरील सर्व झाडं जळून खाक होण्याची भीती आहे, तर दुसरीकडे या महायुद्धात वापरण्यात आलेली शस्त्रे आकाशात तरंगणारे उपग्रहही नष्ट करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जगात  न्यूक्लियर विंटर सुरू होऊ शकतो. अशा परिस्थितीत पृथ्वीवर राहणं कठीण होईल. 'Why You Wouldn't Survive World War 3' या यूट्यूब चॅनलवर जगातील शहरांवर अणुबॉम्ब हल्ल्याचे परिणाम दाखविणारा व्हिडिओ आहे, जो धक्कादायक आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांचा वैदिक ज्योतिषाशी कोणताही संबंध नाही, परंतु देश आणि जगाविषयी त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. 


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)