Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांची भविष्यवाणी, ज्यामुळे जगात भितीचं वातावरण
बाबा वेंगा यांच्या `या` भविष्यवाणीमुळे जगात सर्वत्र भिती, त्यांची भाकितं खरी ठरली तर....
मुंबई : 111 वर्षांपूर्वी बुल्गारिया (Bulgaria) येथे जन्मलेल्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांची आजपर्यंत अनेक भाकितं केली. बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकितं आजवर खरी ठरली आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी वादळात बाबा वेंगा यांनी आपली दृष्टी गमावली, पण भविष्यवाण्यांमुळे बाबा वेंगा यांना जगभरात चांगलीच ओळख मिळाली. मृत्यूपूर्वी, बाबा वेंगा यांनी 2022 आणि येणार्या काळासाठी अनेक महत्त्वपूर्ण भविष्यवाण्या केल्या होत्या.
बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी
- बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल आणि याशिवाय, 2028 मध्ये अंतराळवीर शुक्र ग्रहावर प्रवास करतील.
- बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, 2046 मध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने लोक 100 वर्षांहून अधिक जगू शकतील.
- बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2100 मध्ये पृथ्वीवर रात्र होणार नाही. पृथ्वी कृत्रिम सूर्यप्रकाशाने प्रकाशित होईल.
- एवढंच नाही तर बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 5079 मध्ये जगाचा अंत होईल.
बाबा वेंगा यांनी वर्तवलेली दोन भाकितं खरी ठरली
2022 या वर्षासाठी बाबा वेंगा यांनी दोन भाकितं वर्तवली होती. त्यात आशिया आणि ऑस्ट्रेलियातील काही भागात पूरस्थिती निर्माण होईल असं सांगितलं होतं. ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. कारण या वर्षी या देशात जोरदार पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली होती.
आशियामध्ये बांगलादेश, भारतातील उत्तर पूर्व भाग आणि थायलंडला पुराचा फटका बसला होता. दुसरीकडे दुष्काळामुळे काही शहरांना पाणीटंचाईची झळ बसेल, असेही बाबा वेंगा यांनी सांगितलं.
पोर्तुगालने आपल्या नागरिकांना त्यांच्या पाण्याच्या वापरावर मर्यादा घालण्यास सांगितले आहे. तसेच इटली सध्या 1950 नंतरच्या सर्वात वाईट दुष्काळातून जात आहे. त्यामुळे त्यांनी वर्तवलेली दोन भाकितं खरी ठरली आहेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)