Baba vanga Predictions For 2022: भविष्यातील कोणत्याही घटनेचं भाकित वर्तवण हे जर तर वर अवलंबून असतं. त्यामुळे प्रत्येक भविष्य खरं ठरतं असं नाही. त्यामुळे शक्यतो या भविष्य कथनाकडे लोकं गांभीर्याने पाहात नाहीत. पण एखाद्या व्यक्तीने केलेलं भाकीत वारंवार खरं ठरत असेल, तर लोकं त्यावर विश्वास ठेवू लागतात. महान भविष्यवेत्ता म्हणून फ्रान्सचा नास्त्रेदमसची ओळख आहे. त्यानंतर बल्गेरियात राहणारे अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा यांचं नाव येतं. बाबा वेंगा यांची प्रसिद्ध भविष्यवेत्ता म्हणून जगासमोर ओळख आहे. त्यांनी वर्तवलेली भाकितं आतापर्यंत खरी ठरली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1911 मध्ये बल्गेरियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांची वयाच्या 12 व्या वर्षी एका मोठ्या वादळात गूढपणे त्यांची दृष्टी गेली होती.  त्या बदल्यात त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली, असं बोललं जात आहे. त्यांचे कुटुंब अत्यंत गरीब होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे उपचारासाठीही पैसे नव्हते.निधनापूर्वी त्यांनी अनेक भाकितं वर्तवली आहेत. त्यामुळे पुढे काय होणार? याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता असते. आतापर्यंत 2022 या वर्षासाठी त्यांनी सांगितलेली सहा पैकी दोन भाकितं खरी ठरली आहेत. 


बाबा वेंगा यांनी वर्तवलेली दोन भाकितं खरी ठरली


2022 या वर्षासाठी बाबा वेंगा यांनी दोन भाकितं वर्तवली होती. त्यात आशिया आणि ऑस्ट्रेलियातील काही भागात पूरस्थिती निर्माण होईल असं सांगितलं होतं. ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. कारण या वर्षी या देशात जोरदार पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली होती. आशियामध्ये बांगलादेश, भारतातील उत्तर पूर्व भाग आणि थायलंडला पुराचा फटका बसला होता. दुसरीकडे दुष्काळामुळे काही शहरांना पाणीटंचाईची झळ बसेल, असेही बाबा वेंगा यांनी सांगितलं आहे. युरोपातही तेच सुरू आहे. पोर्तुगालने आपल्या नागरिकांना त्यांच्या पाण्याच्या वापरावर मर्यादा घालण्यास सांगितले आहे. तसेच इटली सध्या 1950 नंतरच्या सर्वात वाईट दुष्काळातून जात आहे. त्यामुळे त्यांनी वर्तवलेली दोन भाकितं खरी ठरली आहेत.


आता चार भाकितं खरी ठरणार का?


या वर्षी सायबेरियातून एक नवीन प्राणघातक विषाणू प्रसार होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच पृथ्वीवर एलियन हल्ला असंही भाकित त्यांनी वर्तवलं आहे. त्याचबरोबर टोळ (Locusts) हल्ला होण्याची शक्यता आहे.  त्याचबरोबर या काळात गॅजेट्सचा मोठ्या प्रमाणात वापर वाढेल. त्यामुळे लोकांचा गॅजेट्स समोरील स्क्रिन टाईम वाढेल. यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडेल, अशी भाकितं बाबा वेंगा यांनी वर्तवली आहेत.