Remedies For Shani Dev: नऊ ग्रहांमध्ये शनिला न्यायदेवता म्हणून संबोधलं जात. शनि गोचर कुंडलीनुसार दर अडीच वर्षांनी राशी बदल करतात. त्यामुळे शनिचा गोचर मंद गतीने होत असतो. त्यामुळे शनि राशीत (Shani) आले की, आपल्या कर्मांचा हिशोब करतात. त्यामुळे शनिदेव राशीत आले की, भल्याभल्यांना घाम फुटतो. शनिदेवांच्या दृष्टीतून कोणीही वाचू शकत नाही. शनिची कृपा असल्यास रंकाचा राजा होऊ शकतो. अडीचकी, साडेसाती (Shani Sadesati), शनिदोष, महादशा आणि अंतर्दशा यामुळे शनिचा प्रभाव पडत असतो. कामात अडचणींचा डोंगर उभा राहतो. कधी कधी नेमकं काय होतं हेच कळत नाही. ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्रत- तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवायची असेल तर शनिवारी व्रत करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. हा उपाय अत्यंत फलदायी मानला जाता. हा उपाय केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्याचबरोबर एका लोखंड्याच्या भांड्यात मोहरीचं तेल घेऊन त्यात आपला चेहरा पाहावा. हे तेल शनि मंदिरात दान करावं. यासोबतच चपातीला मोहरीचं तेल लावून कुत्र्याला खायला दिल्यास शुभ फळ मिळतं.


मंत्र- शनिवारी शनिदेवाच्या मंत्रांचा जप करा. ‘ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः’ आणि ‘ॐ शं शनैश्चराय नमः’ यापैकी एका मंत्राचा जप करा. यासोबतच शनिवारी गरीब लोकांना मदत करा आणि जमेल तेवढे दान करा. तुम्हाला जीवनातील प्रत्येक संकटातून मुक्ती मिळेल.


Shukra Gochar: दोन दिवसानंतर या राशींना मिळणार शुभ फळ! शुक्र गोचराचा सकारात्मक परिणाम


हनुमान चालिसा- शनिदेवांचा प्रकोप कमी करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे. यामुळे जीवनात प्रगती होते आणि अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. त्यासोबत शिव चालिसाचे पठण केल्यानेही शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी काळे वस्त्र परिधान करून नियमानुसार शनियंत्राची पूजा करावी.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)