Balarista Dosh: होळीच्या दिवशी चंद्र ग्रहणासोबत बालरिष्ट दोष; `या` व्यक्तींनी राहावं सावध
Holi 2024 Grahan And Balarista Dosh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या मीन राशीमध्ये मायावी ग्रह राहू आहे. याशिवाय सूर्यही मीन राशीत असणार आहे. यावेळी सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ‘ग्रहण योग’ही तयार होत आहे.
Holi 2024 Grahan And Balarista Dosh: वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी होणार आहे. मुख्य म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये. मात्र या ग्रहणाचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय राहू आणि सूर्य देखील समस्या निर्माण करू शकतात.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या मीन राशीमध्ये मायावी ग्रह राहू आहे. याशिवाय सूर्यही मीन राशीत असणार आहे. यावेळी सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ‘ग्रहण योग’ही तयार होत आहे. 24 मार्च रोजी दुपारी 2:20 वाजता उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात चंद्र केतूसोबत कन्या राशीत असणार. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे बालरिष्ट दोष तयार होणार आहे. होळीमध्ये ग्रहांच्या अशा स्थितीसह चंद्रग्रहणामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी सावधान होण्याची गरज आहे.
मेष रास (Mesh Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण सोबतच ग्रहण दोष आणि बालरिष्ट दोष या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार नाहीत. या राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतील. यासोबतच तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही जास्त फायदा होणार नाही. आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुम्हाला दबावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला सहकाऱ्यांकडून अडचणी येतील
कुंभ रास (Kumbha Zodiac)
या राशीच्या लोकांसाठीही होळीचा दिवस फारसा चांगला राहणार नाही. तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. वरिष्ठांकडून सहकार्य मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही अचानक नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायातही करा किंवा मरोची परिस्थिती निर्माण होऊ शकते. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मीन रास (Meen Zodiac)
होळीचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खूप अडचणी निर्माण करू शकतो. या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मीन राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. तुम्ही तुमच्या कामात असमाधानी असाल. व्यवसायाच्या क्षेत्रातही थोडे सावध राहण्याची गरज आहे. सावध न राहिल्यास नुकसान होऊ शकते. आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )