Holi 2024 Grahan And Balarista Dosh : होळीच्या उत्सावाला यंदा चंद्रग्रहणाच विरजण लागलं आहे. 24 मार्चला होलिका दहन आणि  25 मार्चला रंगांची उधळण करण्यात येणार आहे. पण यंदा या वर्षातील पहिलं ग्रहण हे 25 मार्चला असणार आहे. याचा अर्थ रंगांच्या होळीला चंद्रग्रहणाची सावली असणार आहे. त्यामुळे होळीचा हा सणाला रंगांची उधळण करायची की नाही असा संभ्रम लोकांमध्ये आहे. चंद्रग्रहण हे खगोलशास्त्रीय घटना असली तरी वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्र पंडितांनुसार चंद्रग्रहणाचा परिणाम हा 12 राशींवर होणार आहे. काहींसाठी सकारात्मक तर काहींसाठी तो नकारात्मक असणार आहे. 25 मार्चला चंद्रग्रहणासोबत एक विशिष्ट दोष निर्माण होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 मार्चला दुपारी 2:20 वाजता कन्या राशीत उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात चंद्र केतूसोबत असणार आहेत. या नक्षत्र आणि ग्रहाच्या संयोगातून  बालरिष्ट दोष निर्माण होणार आहे. या दोष काहींसाठी अशुभ असेल असं पंडित आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय. आनंद पिंपळकर म्हणतात यादिवशी ग्रहण योगही असल्याने काही राशींना सतर्क राहण्याची गरज आहे पाहूयात. (Balarista Dosh due to conjunction of Rahu Sun with lunar eclipse on Holi Grahan Yog These zodiac sign will suffer financial loss)


मेष रास (Aries Zodiac)  


या राशीच्या व्यक्तीला चंद्रग्रहण, ग्रहण योग आणि बालरिष्ट दोषाचा नकारात्मक परिणाम होणार आहे. या लोकांना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. पंडित सांगतात की, या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. प्रसंगी काही गोष्टीमध्ये तडजोड करणे तुम्हाला फायद्याच ठरेल. करिअरमध्ये चढ उतार असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी कुरघोडी करण्याची शक्यता आहे. कामात अडथळा येण्याचीही दाट शक्यता आहे. 


कुंभ रास (Aquarius Zodiac) 


आनंद पिंपळकर सांगतात की, या राशीच्या लोकांना अनेक समस्या त्रासदायक ठरणार आहे. घरात असो किंवा कामाच्या ठिकाणी अडचणींचा डोंगर यांना पार करावा लागणार आहे. नातेसंबंधात तणाव निर्माण होईल. जोडीदारासोबत वाद होण्याची दाट शक्यता आहे. करिअरबद्दल बोलायचं झालं तर कोणाचंही सहकार्य लाभणार नाही. त्यामुळे तुम्हाला तणाव जाणवणार आहे. कितीही मेहनत केली तरी अपेक्षित फळ तुम्हाला मिळणार नाही. अगदी वैतागून तुम्ही नोकरी शोधण्यास सुरुवात करणार आहात. कोणताही निर्णय घेताना शंभर नाही तर हजार वेळा विचार करा. 


मीन रास (Pisces Zodiac)  


आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय की, या राशीच्या लोकांच्या आयुष्याला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. एकामागून एक अडचणी यांची वाट पाहत असेल. होळीचा हा सण त्यांच्या आयुष्यात बेरंग ठरणार आहे. कारण आरोग्याची समस्येसोबत घरात वाद आणि करिअरमध्येही अडचणी असा अनेक समस्याने या राशीच्या व्यक्ती घेरणार आहेत. त्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास ढासळणार आहे. तुमचं कुठल्याही कामात रस राहणार नाही. आर्थिक बाबतीत सावध राहा, नाहीतर अडचणीत सापडला. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)