Saraswati Puja 2023: हिंदू दिनदर्शिकेनुसार (Panchang) माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 2023ला वसंत पंचमी (Vasant Panchami 2022) हा सण साजरा केला जाणार आहे. विद्या, वाणी आणि कलेची देवी सरस्वतीची या दिवशी पूजा केली जाते. या दिवसाला सरस्वती पूजा असे देखील म्हणतात. हिंदू धर्मात सरस्वती पूजनाच्या दिवशी मुलांचे शिक्षण किंवा अक्षर ज्ञान सुरू करण्याची परंपरा आहे. वसंत पंचमीला (Basant Panchami 2022) सरस्वती पूजन (Saraswati Puja) का केले जाते यामागेही एक पौराणिक मान्यता आहे. या वर्षी सरस्वती पूजा कधी आहे? पूजेची वेळ कोणती आणि महत्त्व जाणून घ्या...  


वसंत पंचमी तिथी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माघ शुक्ल पंचमी 25 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12:34 वाजता सुरू होऊन 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:28 वाजता संपेल. म्हणूनच या वर्षी उदया तिथीनुसार 26 जानेवारी 2023 रोजी वसंत पंचमी साजरी होणार आहे.


वसंत पंचमी दिवशी करा पूजा 


- वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे रंगाचे कपडे घालावेत. त्यानंतर सरस्वती पूजनाचा संकल्प घ्यावा.
- पूजेच्या ठिकाणी सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावी. माता सरस्वतीला गंगाजलाने स्नान घालून पिवळे कपडे घालावे. यानंतर पिवळी फुले, अक्षत, पांढरे चंदन किंवा पिवळी रोळी, पिवळा गुलाल, धूप, दिवा, गंध अर्पण करा. सरस्वती मातेला झेंडूच्या फुलांचा हार घालावा.
- आईला पिवळी मिठाई अर्पण करावी. यानंतर सरस्वती वंदना आणि मंत्राने माता सरस्वतीची पूजा करावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पूजेच्या वेळी सरस्वती कवचही पाठ करू शकता.
- शेवटी हवन कुंड बनवून हवन साहित्य तयार करावं आणि “ओम श्री सरस्वत्याय नम: स्वाहा” या मंत्राचा जप करून हवन करावा. नंतर माँ सरस्वतीची आरती करावी.  


वाचा: माघी गणेश जयंती आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत 


वसंत पंचमीला आपण सरस्वती पूजन का करतो?


माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच वसंत पंचमीला ज्ञान आणि वाणीची देवी सरस्वती ब्रह्मदेवाच्या मुखातून अवतरली होती अशी पौराणिक मान्यता आहे. हा दिवस देवी सरस्वतीच्या पूजेला (Saraswati Puja importance) समर्पित केला जातो. यासाठी दरवर्षी वसंत पंचमीला सरस्वती पूजन केले जातेय. धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीला पूजा केल्याने माँ सरस्वती लवकर प्रसन्न होते अशी मानले जाते.