Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला असे करा प्रसन्न!

Ganesh Jayanti 2023: माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गणेश जयंती म्हणूनही ओळखली जाते. गणेश जयंती 25 जानेवारी म्हणजे आज आहे. या दिवशीचे शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र आणि गणपती पूजेचे नियम जाणून घेऊया... 

Updated: Jan 25, 2023, 10:33 AM IST
Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला असे करा प्रसन्न! title=
Ganesh Jayanti 2023 shubha muhurt and puja vidhi mantra bhog in marathi

Ganesh Jayanti 2023: मराठी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी आणि वरद कुंड चतुर्थी असेही म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार पार्वतीचा पुत्र गणेशाचा या तिथीला जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला गणेश जयंती असे म्हटले जाते. हिंदू संस्कृतीत बाप्पाला महत्त्वाचे स्थान आहे. आपण नेहमी गणपतीची पूजा करतो.  

पूजेचा शुभ मुहूर्त

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीत आज गणेश चतुर्थी असून दुपारी 3.22 मिनिटांनी सुरू होईल आणि 12.34 मिनिटांपर्यंत संपेल. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.29 ते 12.34 पर्यंत असेल. परीघ योग 24 जानेवारी रोजी रात्री 9.36 ते 25 जानेवारी सायंकाळी 6.15 पर्यंत असेल. तसेच शिवयोग 25 जानेवारीच्या संध्याकाळी 6.15 ते 26 जानेवारीला सकाळी 10.28 पर्यंत असेल. 

वाचा: आज माघी गणेश जयंती : करा हे सोपे उपाय, मिळेल प्रमोशन, चिंता दूर होईल  

गणेश जयंतीसाठी पूजा विधी

आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून उपवास करावा. यानंतर गणेशाची आराधना करण्यासाठी लाकडी चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसरवून गणपतीची मूर्ती ठेवा. यानंतर पाण्याने आचमन करून गणपतीला फुले, हार, कुंकू, हळद, टाकून ती गणपतीला घालावी आणि 'श्री गणेशाय नमः दुर्वाकुरान समर्पयामि।. मंत्राचा उच्चार करताना 11 किंवा 21 दुर्वा जोडून अर्पण करा. यानंतर देवाला बुंदीचे लाडू, मोदक किंवा प्रसाद अर्पण करा. त्यानंतर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून मंत्र, स्तोत्राचे यथायोग्य पूजन करावे. शेवटी कुटुंबासमवेत आरती करावी आणि झालेल्या चुकीची माफी मागावी. 

आजच्या दिवशी हे काम करू नका

- गणेश जयंतीला गणपतीच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर करू नका.

- बाप्पाच्या पूजेत सुकी फुले, केतकीचे फूल, पांढऱ्या रंगाच्या वस्तू तुटलेल्या अक्षता यांचा वापर करण्यास मनाई आहे.

- गणेश जयंतीच्या दिवशी चुकूनही कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका. यामुळे केतूचे अशुभ परिणाम मिळतात. यासोबतच बोलण्यात दोष असल्याचे दिसून येते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)