Surya Nakshatra Gochar 2023: ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतात. राशीप्रमाणे काही ग्रह सूर्य, ग्रहांचा राजा, ठराविक कालावधीनंतर ग्रह किंवा नक्षत्र बदलतो. सूर्याच्या या बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने 7 नोव्हेंबरला पहाटे ३.५२ वाजता विशाखा नक्षत्रात प्रवेश केला. 17 नोव्हेंबरपर्यंत तो या नक्षत्रात राहणार आहे. यानंतर तो अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 27 नक्षत्रांपैकी विशाखा नक्षत्र हे 16वे नक्षत्र मानलं जातं. अशावेळी काही राशीच्या लोकांना दिवाळीपर्यंत विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींना नक्षत्राच्या बदलामुळे विशेष लाभ मिळू शकतो.


वृश्चिक रास (Vraschik Zodiac)


वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात विशेष लाभ मिळू शकतो. पैसे कमवण्यात यशस्वी होण्यासोबतच तुम्ही बचतही करू शकाल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकणार आहे. तुम्हाला काही मोठी जबाबदारीही मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या यशासह आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीही मजबूत राहील. 


धनु रास (Dhanu Zodiac)


हा नक्षत्र बदल गुरुच्या राशीच्या धनु राशीसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा स्थितीत तुम्हाला फायदाच मिळू शकतो. नोकरी-व्यवसायात अपार यशासोबत संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. अशी संधी मिळाली तर सोडू नका. बिझनेसमध्ये मोठ्या करारावर स्वाक्षरी होऊ शकते. अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नसणार आहे. 


कुंभ रास (Kumbha Zodiac)


विशाखा नक्षत्रात सूर्याचा प्रवेश देखील कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. नवीन कामात सकारात्मक परिणाम दिसू शकतात. नोकरदार लोकांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला कुटुंब किंवा मित्रांसह सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )