Kharmas / Holashtak 2024 : अख्खा देश एका रंगात रंगतो, भेदभाव, जात धर्म सगळं विसरुन फक्त प्रेम आणि आनंदाचा सण म्हणजे होळी. यंदा रंगांचा हा सण 25 मार्चला साजरा करण्यात येणार आहे. मात्र हिंदू धर्मात होळीपूर्वी काही शुभ कार्यांवर बंदी असते. यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? ती कामं कुठली आणि याबद्दल शास्त्र काय सांगतं. (Before Holi these auspicious works will take a break But do these 5 things you will get happiness and prosperity kharmas holashtak chandra grahan)


शुभ कार्यावर का बंदी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे होळीचा आनंद असताना वातावरण असतानाच दुसरीकडे खरमास, होळाष्टक आणि चंद्रग्रहणामुळे धर्मशास्त्रानुसार काही शुभ कार्य करता येणार नाही आहे. यावेळी होळीपूर्वी खरमास, होलाष्टक सुरू होणार आहे. तर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. 


खरमास कधी आहे ?


यंदा खरमास 14 मार्च 2024 पासून सुरू होणार असून धार्मिक मान्यतेनुसार खरमासात कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते. हा खरमास महिनाभर असून 13 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे. हिंदू धर्मानुसार या काळात कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही. 


होलाष्टक कधीपासून सुरु होणार?


होळीच्या बरोबर 8 दिवसांपूर्वी होळाष्टक सुरु होते. पंचांगानुसार यंदा होलाष्टक 17 मार्चला सकाळी 9.53 वाजेपासून 24 मार्चपर्यंत असणार आहे. शास्त्रातही होळाष्टकाच्या वेळी विवाह, तोरण, नामकरण इत्यादी शुभ कार्ये करण्यास मनाई असते. 


होळीला वर्षातील पहिलं चंद्रग्रहण!


रंगांची उधळण सोबत यंदा वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक कालावधी अवैध नसणार आहे. चंद्रग्रहण 25 मार्च 2024 ला सकाळी 10:23 ते दुपारी 03:02 वाजेपर्यंत असणार आहे. धर्मशास्त्रात चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. त्यामुळे या काळात अनेक गोष्टी करण्यावर बंदी असते. खास करुन गर्भवती महिल्यांवर अनेक बंधनने असतात. 


हेसुद्धा वाचा - Holi 2024 Date : होळी आणि धुलिवंदन कधी? चंद्रग्रहण सावली असल्याने जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी


होळीपूर्वी कुठल्या शुभ कार्यावर बंदी?


खरमास, होलाष्टक आणि चंद्रग्रहणामुळे या काळात विवाह, नामकरण, मुलांचं मुंडण, ग्रहप्रवेश किंवा नवीन घर खरेदी, यज्ञ-हवन यांसारखी शुभ कार्ये करणे हिंदू धर्मशास्त्रानुसार निषिद्ध गेले आहेत. या काळात हे शुभ कार्य केल्याने जीवनात समस्या निर्माण होतात अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे. 


खरमासात 'या' गोष्टी नक्की करा!


खरमासात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि सूर्यमंत्राचा जप करा. यामुळे ग्रहांचा राजा सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहते. सूर्याच्या कृपेने तुमचं नशीब बलवान होतं अशी मान्यता आहे. 


खरमासात भगवान विष्णूची उपासना करणे खूप फलदायी मानली जाते. तुम्ही भगवान विष्णूची पूजा करुन त्यांना पिवळे पदार्यंचं नैवेद्य लावल्यास ते प्रसन्न होतात. यामुळे तुमची ग्रहस्थितीही शांत होते आणि गुरूची स्थिती मजबूत होते.  


हिंदू धर्मात दानधर्माला खूप महत्त्व आहे. दान केल्याने तुमचं कर्मे सुधारतात आणि दानाचे फळ तुम्हाला मृत्यूनंतरही मिळतं अशी मान्यता आहे. घरात सुख समृद्धी नांदते. 


गरीब आणि गरजूंना अन्नदान केल्याने तुमच्यावरील सर्व संकट दूर होतात, असं सांगण्यात आलंय. तुम्ही गरजू लोकांना धान्य, फळे, कपडे आणि पाणी दान करावं. याशिवाय भुकेलेल्या पशु-पक्ष्यांनाही अन्न, पाणीदान केल्याने पुण्य प्राप्त होतं. 


दोष दूर करण्याचा आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे गायीला हिरवे गवत खायला द्यावे, त्यामुळे तुम्हाला फायदा मिळतो.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)