Belpatra Benefits: घरात या दिशेला बेलपत्र लावल्यास व्हाल मालामाल; प्रत्येक संकट होईल दूर
अंघोळीनंतर त्यांचा जलाभिषेक केल्यानंतर बेलपत्र अर्पित केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. असं केल्याने भक्तांची दुःख दूर होतात, असं मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये, बेलपत्राचं रोप लावण्याचे खास महत्त्व सांगण्यात आलं आहे.
Belpatra Benefits: हिंदू धर्मामध्ये भगवान शिव यांची पूजा आणि त्यांना अर्पण करण्यात येणारं बेलपत्र यांना खूप महत्त्वाचं मानलं जातं. सोमवारच्या दिवशी अंघोळीनंतर त्यांचा जलाभिषेक केल्यानंतर बेलपत्र अर्पित केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. असं केल्याने भक्तांची दुःख दूर होतात, असं मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये, बेलपत्राचं रोप लावण्याचे खास महत्त्व सांगण्यात आलं आहे.
घराच्या योग्य दिशेला बेलपत्र लावल्याने अनेक समस्यांचं समाधान होतं. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे, ज्या घरामध्ये बेलपत्राचं रोप आहे, ती जागा कोणत्या तीर्थस्थानापेक्षा कमी नाहीये.
बेलपत्रामुळे मिळतं पुण्य
शिवपुराणामध्ये नमूद केल्याप्रमाणे, सोमवारी पूजेच्या वेळी भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात. शास्त्राप्रमाणे, शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने एक कोटी कन्यादानाचं पुण्य प्राप्त होतं असं मानतात. याशिवाय भगवान शिव तसंच हनुमान या दोघांचा आशीर्वाद प्राप्त होण्यास मदत होते. घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने कुटुंब पापांच्या प्रभावापासून मुक्त होतं.
गरिबी दूर होते
जर तुम्ही गरीबीत असाल तर घरामध्ये बेलपत्राचे रोप लावावं. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. याशिवाय बेलपत्रामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते. घरातील धन वाढवण्यासाठी उत्तर-दक्षिण दिशेला रोपं लावावं.
कुटुंबातील सदस्य उत्साही राहण्यास मदत होते
शिवपुराणानुसार, बेलपत्राच्या झाडाच्या मुळांमध्ये गिरिजा मातेचा वास असतो. त्यामुळे घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला बेलपत्राचं रोप लावल्यास घरातील सदस्य स्ट्रॉंग होतात, असं ज्योतिषशास्त्रात म्हटलंय.
वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही
वास्तूशास्त्राप्रमाणे, बेलपत्राचं रोप घराच्या अंगणार लावल्यास वाईट शक्तींचा घरामध्ये प्रवेश होत नाही. या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
या दिवशी बेलपत्र तोडू नये
ज्योतिष शास्त्रानुसार, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावास्या तिथिला बेलपत्र तोडू नये. याचसोबत संक्रातीचा काळ आणि सोमवारी रोपाची पानं तोडू नये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)