Silver Ring Tips : हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी का घालतात? महिला आणि पुरुषासाठी अंगठीचे नियम जाणून घ्या
Benefits of Wearing Silver ring : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांशी धातूचा संबंध असतो. त्यामुळे त्या धातूचा योग्य वापर केल्यास व्यक्तीला अनेक फायदे होतात. मग हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी घालण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
Benefits of Wearing Silver Ring : तुम्ही पाहिलं असेल अनेक महिला आणि पुरुषांच्या हाताच्या अंगठ्यामध्ये चांदीची रिंग असते. त्यामागील कारण तुम्हाला माहितीये का? तर ज्योतिषशास्त्रानुसार, धातू ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी चांगला उपाय ठरतात. भौतिक सुखसोयी मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत घेतो, परंतु अनेक वेळा आपण केलेल्या मेहनतीचे फळ मिळत नाही. अनेक वेळा आपल्याला असे वाटते की आपले नशीब आपल्या बाजूने नाही. सतत पैशांची चणचण जाणवते. अशावेळी ज्योतिषशास्त्रानुसार चांदीची अंगठी ही आपल्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरते. (Benefits of Wearing Silver ring Astro tips for silver ring Why do you wear a silver ring on your thumb )
हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी का घालतात?
चांदीच्या अंगठ्याचा संबंध शुक्र आणि चंद्राशी असतो. सोन्या-चांदीपासून बनवलेल्या या दागिन्यांचा कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांवरही परिणाम होतो, असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. सोन्याचा संबंध गुरू ग्रहाशी आहे. त्यामुळे चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्राशी मानला जातो. मान्यतेनुसार, चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यांपासून झाली आहे, म्हणून जिथे चांदी आहे तिथे धन, समृद्धी आणि समृद्धी आहे. याशिवाय, काही राशी आहेत ज्यांच्या लोकांना चांदीची अंगठी घालणे खूप फायदेशीर मानली जाते. अंगठा इच्छाशक्ती, सामर्थ्य, आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे. अंगठ्यावर चांदीची अंगठी घालल्याने या गुणांमध्ये वाढ होते.अंगठ्यावर अंगठी घालणे धन किंवा प्रभाव दर्शवते.
तर एवढंच नाही तर मन शांत ठेवण्यासही मदत होते. माणसाला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्यास मदत मिळते. शरीरातील उष्णता चांदी शोषून घेते.
चांदीची अंगठी घालण्याबाबत काही गोष्टी
चांदीच्या अंगठ्या नेहमी हाताच्या अंगठ्यावर घालाव्यात.
महिलांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी घालणे शुभ असते.
कोणत्या दिवशी चांदीची अंगठी घालायची?
शास्त्रानुसार सोमवार किंवा शुक्रवारी चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. ते घालण्यासाठी सर्वप्रथम रविवारी किंवा गुरुवारी चांदीची अंगठी विकत घ्या आणि रात्रभर दुधाच्या भांड्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच सोमवारी किंवा शुक्रवारी ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि घाला.
कोणी चांदीची अंगठी परिधान करावी आणि कोणी नाही?
कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी चांदीची अंगठी घालणे खूप शुभ मानले जाते. वृषभ आणि तूळ राशीचे लोक देखील चांदीची अंगठी घालू शकतात. याशिवाय मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नये.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)