Bhadra Rajyoga 2023 : बुद्धिमता, उन्नती, प्रगतीचा कारक ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह(Budh Gochar 2023) एक महिन्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. येत्या 24 ऑगस्टला Budh Vakri होणार आहे. तर सप्टेंबर महिन्यात बुध ग्रह उदय (Budh Uday) होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रह पुन्हा गोचर करणार आहे. पण यावेळी बुध ग्रह कन्यात राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा राजकुमार कन्या राशीत प्रवेश करतो तेव्हा भद्रा राजयोग तयार होत असतो. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रह काही राशींच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देणार आहे. (bhadra rajyoga 2023 mercury will change these zodiac signs Budh Gochar 2023)


'या' राशींचं नशिबात मिळणार कलाटणी


कन्या (Virgo) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध गोचरमुळे तयार झालेला भद्रा राजयोग या राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे.  या लोकांचं व्यक्तिमत्वात वेगळीच चमक येणार आहे. तर संभाषण कौशल्यातही उत्तम होणार आहेत. जोडीदारासोबत प्रेम अजून मजबूत होणार आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचे बेत आखाल. भागीदारीतून व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम काळ असून यातून आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असून प्रतिष्ठा वाढणार आहे. 


मकर (Capricorn)


बुध गोचरमुळे तयार झालेला भद्रा राजयोग या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ही लोक अडचणीतून बाहेर पडणार आहेत. नोकरी आणि व्यवसायात अच्छे दिन येणार आहे. कोर्टात प्रलंबित प्रकरण निकाली लागण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. व्यवसायासाठी प्रवास करावा लागणार आहे. कुटुंबात धार्मिक कार्य होणार आहे. 


धनु (Sagittarius)



बुध गोचरमुळे तयार झालेल्या भद्रा राजयोग हा या राशीच्या लोकांसाठी नशिबवान ठरणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार आहे. व्यवसायातून मोठा फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी मान सन्मानासोबत पदोन्नतीत वाढ होणार आहे. नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. जोडीदार आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालविणार आहात. 


 


हेसुद्धा वाचा - Guru Chandal Yog 'या' राशींच्या लोकांसाठी त्रासदायक, आर्थिक व्यवहारात सावध राहा



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)