Bhadrapada Month 2022 :  भाद्रपद महिना सुरु झाला आहे. भाद्रपद महिना म्हणजे सणासुदीचा महिना असतो. जन्माष्टमीपासून सणाला सुरुवात होते. याच महिन्यात 10 दिवसांसाठी गणरायाचं आगमन होतं असतं. भाद्रपद महिना 10 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या महिना धार्मिक विधी आणि पूजेसाठी खूप मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात काही गोष्टी करणे अशुभ मानले जातं. ज्योतिषशास्त्रानुसार कुठल्या गोष्टी करायला नको ते पाहूयात. (bhadrapada month 2022 bhadrapada maas not do these ashubh kaam in marathi)


महिनाभर करू नका हे अशुभ काम!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. गूळ, दही आणि त्यापासून तयार केले पदार्थचे सेवन करु नका. ज्योतिषशास्त्रानुसार या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपण आजारी पडू शकतो. 


2. लसूण-कांदा, मांसाहारी आणि दारूचं अजिबात सेवन करु नये. या गोष्टी केल्यास तुमच्या आयुष्यात संकटं येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात जमिनीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. 


3. या महिन्यात इतरांकडून काही गोष्टी मागणे टाळा. उदा. इतरांकडून भात मागून खाऊ नये.


4. रविवारी मीठाचे सेवन करु नये. तसंच केस कापू नका. 


भाद्रपद महिन्यातील रविवारला विशेष महत्त्वं असतं. रविवारच्या दिवशी सूर्याची उपासना केल्यास आत्मविश्वास वाढतो. नोकरी आणि व्यवसायात यश मिळतं. त्यामुळे या महिन्यातील रविवारी सूर्याला जल अपर्ण करा, असं ज्योतिषी सांगतात.


(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)