भाऊबीज 2022 : देशभरात सोमवारी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आता बहिणींना भाऊबीज आणि महिला पाडव्याची वाट पाहत आहेत. कारण भाऊराया गिफ्ट देणार आणि पाडव्याला नवऱ्याकडून गिफ्ट...पण यंदा भाऊबीज कधी आहे याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. 26 ऑक्टोबर  की 27 ऑक्टोबर नक्की कधी आहे भाऊबीज. तर शास्त्रानुसार 26 ऑक्टोबरला भाऊबीज सण साजरा करण्यात येणार आहेत. यंदा पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आली आहे. भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीचा सण संपतो. 


भाऊबीज 2022 चा मुहूर्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक शुक्ल द्वितीया तिथी प्रारंभ - 26 ऑक्टोबर 2022, दुपारी 02.42 वा.
कार्तिक शुक्ल द्वितीया समाप्ती - 27 ऑक्टोबर 2022, दुपारी 12.45 वा.



याचा अर्थ कार्तिक शुक्ल द्वितीया तिथी ही 26 आणि 27 ऑक्टोबर दोन्ही दिवशी आहे. म्हणजे भावांसाठी आनंदाची बातमी आहे ते बहिणीकडे जायला त्यांचाकडे दोन दिवस आहेत. 


भाऊबीजेसाठी शुभ मुहूर्त 


26 ऑक्टोबर


दुपारी 01.18 - दुपारी 03.33


27 ऑक्टोबर


सकाळी 11.07 ते दुपारी 12.46 पर्यंत


भाऊबीज पूजा 


यादिवशी यमुना नदीत स्नानाला विशेष महत्त्व आहे. हे शक्य नसेल तर सूर्योद्यापूर्वी स्नान करुन सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. भाऊबीजेला शुभ मुहूर्तावर पूजा करा. सर्वप्रथम भावाला पाटावर बसवावे त्यानंतर त्याचे औक्षवान करावे.  ज्योतिषशास्त्रात भावाला ओवाळताना मंत्र सांगण्यात आला आहे. 'गंगा यमुनेची पूजा, यमी यमराजाची पूजा, सुभद्रा कृष्णाची पूजा करा, गंगा-यमुना नीर प्रवाहित करा. हा मंत्र म्हटल्यामुळे भावाचे आयुष्य वाढतं. भावाला मिठाई खाऊ घाला आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी यमदेवतेची प्रार्थना करा.


कोणाची पूजा करावी 


शास्त्रानुसार भाईबीजेच्या दिवशी यमराज, यमदूज आणि चित्रगुप्त यांची पूजा करावी. त्यांच्या नावाने अर्घ्य आणि दिवा दान करावा.


भाऊबीज करण्यामागे कथा


धर्मग्रंथानुसार यमद्वितीयाच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी यमराज बहिण यमुनाच्या घरी गेले होते. बहिणीने यमराज यांची पूजा केली आणि त्यांना जेवण दिले. यावेळी वरदानात यमराजांनी यमुना यांना सांगितलं की,  जे भाऊ यादिवशी म्हणजेच यम द्वितीयेच्या दिवशी आपल्या बहिणींच्या घरी येतात आणि त्यांची पूजा स्वीकारतात भोजन करतात त्यांना कधी अकाली मृत्यूचं भय राहत नाही, अशी पौराणिक आख्यायिका आहे.