Bhai Dooj 2023 : दिवाळीची सांगता आणि दिवाळीतील पाच सणाचा शेवटचा सण भाऊबीज. बहीण भावाच्या प्रेमाचा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा करण्यात येतो. या दिवसाला यम द्वितीया असंही म्हटलं जातं. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्याची आणि सुख समृद्धीबद्दल कामना करते. यंदाची भाऊबीज खास आहे. पंचांगानुसार भाऊबीजेला अतिशय दुर्मिळ योग आहे. जाणून घ्या यंदा भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त... (Bhai Dooj 2023 shubh muhurta of tilak and Keep these things in mind while applying charms and tilak to your brother and yam dwitiya)


भाऊबीज तिथी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला म्हणजेच 14 नोव्हेंबरला पहाटे 02:36 वाजेपासून 15 नोव्हेंबरला पहाटे 01:47 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरा करण्यात येणार आहे. 


दुर्मिळ योग कुठला ?


हिंदू पंचांगानुसार यादिवशी दुपारी 01:57 पर्यंत दुर्मिळ सुकर्मा योग असणार आहे. 


भाऊबीज का साजरी करतात?


भाऊबीज ही यम आणि यमुना या बहीण भावाशी संबंधित आहे. यम हा मृत्यूची देवता आहे. पौराणिक कथेनुसार, यमुना आपल्या भाऊ यमाला अनेकदा सासरी बोलवायची. कोणाचा मृत्यू आला तेव्हाच यम त्या माणसाचा घरी जात असतो. म्हणून यम बहिणीच्या घरी जाणं टाळतं होता. पण एक दिवशी प्रेमापोटी तो बहिणीच्या घरी जातो. यमाला पाहून बहीण यमुना आनंदी झाली तिने पंचपक्वान्न केलं. यमुनाने यमाचं औक्षवाण केलं आणि वचन घेतलं की, वर्षातील एक दिवस यम यमुनेच्या घरी येणार. 


तेव्हापासून बहीण भावाच्या प्रेमासाठी कार्तिक शुद्ध द्वितीया यम द्वितीया म्हणजेच भाऊबीज साजरा करण्यात येते. यादिवशी भाऊ बहिणीच्या सासरी जातो. बहिणी गोडधोड बनवून त्याचं औक्षण करते. आजही ही परंपरा पाळली जाते.  


भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कुठला?


भाऊबीजेसाठी शुभ मुहूर्त हा 15 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपासून 3 वाजून 22 मिनिटांपर्यंत आहे. या दोन तासांमध्ये बहिणीने भावाला ओवाळणे शुभ ठरणार आहे. 


भावाला औक्षण, टिळा लावताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!


भाऊबीजेला बहिणीने भावाचेऔक्षण करण्यासाठी पुजेचं ताटात कुंकू, हळद, अक्षता, नाण, सोनं, सुपारी, नारळ, दिवा, मिठाई आवर्जून ठेवा. 


भावाला औक्षणासाठी चौरंगावर किंवा पाटावर पूर्व पश्चिम या दिशेला बसवावं. 


चौरंग किंवा पाटावर लाल आसन नक्की परिधान करा. 


आता भावाच्या कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावा.


त्यानंतर डोक्यावर अक्षता टाकाव्या आणि भावाच्या दिर्घायुष्याच्या प्रार्थना करा. 


यानंतर भावाला सुपारी, सोन्याच्या एखादा दागिन्याने ओवाळा. यासह ताटातील तुपाच्या दिव्याने भावाची आरती ओवाळून औक्षण पूर्ण करा. औक्षण पूर्ण केल्यानंतर भावाला गोड मिठाई भरवा. 


तर भावांनी ही गोष्ट लक्षात ठेवा!


औक्षणानंतर भावांनी बहिणींना भेटवस्तू द्याव्यात आणि त्यांचं नेहमी रक्षण करण्याचं वचन बहिणीला द्यावं. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)