Bhutadi Amavasya 2023 Date and Puja Vidhi Upay in Marathi: हिंदू धर्मात असे अनेक दिवस आहेत जे पवित्र मानले जातात. आता काही दिवसांवरतीच चैत्र शुद्ध प्रतिपदा (Chaitra Padwa 2023) म्हणजेच चैत्र पाडवा अर्थात गुढीपाडवा (Gudipadwa 2023) आपण सर्वच जण साजरा करणार आहोत. गुढीपाडव्याचा सण म्हणजे आपल्या आयुष्यातील एका नव्या आणि समृद्ध वर्षाची सुरूवात असते. दरवर्षी गुढीपाडव्याचा सण कधी येतोय याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. आपण सर्वच यासाठी आतुर असतो. गुढीपाडव्याला (Gudipadwa Date Muhurat Puja Vidhi) सगळ्यांची घरी गुढी उभारली जाते. रेशमी साडीत गुंडालेली गुढी आपल्या खिडकीपाशी अगदी आकर्षक वाटते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंपाकघरात मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. श्रीखंडपुरी, पुरणपोळ्या अन् सोबत तिखट आणि चटपटीत साग्रसंगीत जेवण (Puranpoli Recipe). या दिवशी आपण सगळेच पारंपारिक वेशात नटतो आणि थटतो. गुढीपाडव्याची चाहूल ही आपल्यासाठी अनेक गोष्टींचा आनंद देऊन जाते. यादिवशी पाडव्याची मिरवणूक निघते आणि सगळीकडे ढोलताशांचा जागर असतो. परंतु तुम्हाला माहितीये का, की फाल्गुन महिन्याच्या शेवटी येणारी भुतडी अमावस्याही साजरी केली जाते. परंतु नक्की ही भुतडी अमावस्या (Bhutadi Amavasya 2023) आहे तरी काय? आणि ती कशी व का साजरी केली जाते? 


भुतडी अमावस्या म्हणजे काय? 


हिंदू धर्मानुसार, अमावस्या ही दर महिन्याला 15 दिवसांनी येते आणि ती कृष्णपक्षाच्या शेवटच्या तारखेला येते. त्या त्या विशेष दिवसांनुसार अमावस्येचे (Krusha Paksha) महत्त्व असते. आता तुम्ही म्हणाल की ही भुतडी अमावस्या नक्की आहे तरी काय? या अमावस्येचा खरंच भुत - प्रेत, पिशाच्च्यांशी संबंध असतो का? परंतु त्याचा भुतांची संबंध नाही. या अमावस्येचे महत्त्व असे मानले आहे की, नकारात्मक शक्ती अथवा अतृप्त आत्मा लोकांना त्यांच्या अपुर्ण इच्छा पुर्ण करायला भाग पडतात तेव्हा या आत्म्यांना शांत करण्यासाठी भूतडी अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करणे आणि दानधर्म केले जाते.  


2023 मध्ये भुतडी अमावस्येचा मुहूर्त, पूजा विधी आणि शुभ योग कधी? (Bhutadi Amavasya 2023 date, Puja Vudhi and Subha Yog)


संपुर्ण वर्षात 12 प्रकारच्या अमावस्या असतात. त्यांची नावं वेगवेगळी असतात आणि महत्त्वंही. 
भुतडी अमावस्या तिथी, मुहूर्त आणि शुभ योग : 


  • चैत्र अमावस्या प्रारंभ - 20 मार्च 2023, रात्री 1 वाजून 47 मिनिटे 

  • चैत्र अमावस्या समाप्त: 21 मार्च 2023, रात्री 10 वाजून 53 मिनिटे 


येत्या वर्षी भूतडी अमावस्या ही मंगळवारी येते आहे. यादिवशी शुभ, शुक्ल आणि सिद्धी योग आहेत. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)