Wearing Black Thread Rules : जिकडे बघावं तिकडे धावपळ धावपळ आणि फक्त धावपळ...वाढती महागाई, कामाचा ताण, पैशाची चणचण यामुळे आपण कायम टेन्शनमध्ये असतो. अनेक वेळा आपली काम होता होता राहून जातात... किंवा त्या कामांमध्ये अनेक अडचणी येतात. असं मानलं जातं की काळा धागा वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण करतो आणि आपल्याला वाईट नजरेपासून वाचवतो. पण तुम्हाला माहिती आहे का? हा काळा धागा (Black Thread) कोणीपण बांधून चालणार नाही. काळा धागा बांधल्यामुळे काही लोकांना अशुभ परिणाम दिसून येतात. 


काळा धागा कोणी घालू नये? (Who Should Not Wear Black Thread)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. राधाकांता वत्स यांच्यानुसार दोन राशीच्या लोकांनी काळा धागा बांधणे टाळावे. त्यात पहिलं नाव आहे वृश्चिक (Scorpio) आणि दुसरं नाव आहे मेष (Aries). वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ (Mangal) मानला जातो आणि मंगळाचा रंग लाल आहे. असं मानलं जातं की मंगळ काळ्या रंगाचा तिरस्कार करतो. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी काळा धागा अजिबात बांधू नये. याचा 'या' राशीच्या लोकांवर विपरीत आणि नकारात्मक प्रभाव पडतो. (Black Thread Benefits of Wearing and Rules regulations nmp) 


त्याच वेळी मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या कारणास्तव मेष राशीसाठी काळा धागा धारण करणे अशुभ ठरू शकतं. या दोन राशीच्या लोकांनी काळा धागा घातला तर त्यांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषाच्या मते या लोकांना धनहानी, मान-सन्मान आणि आरोग्याची हानी सहन करावी लागू शकते. तसंच, कुटुंबातही अशांत वातावरण निर्माण होऊ शकतं. 


काळा धागा बांधण्याचे नियम (Wearing Black Thread Rules)


शनिवार हा काळा धागा घालण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे. अशा स्थितीत जेव्हा कधी काळा धागा बांधण्याचा विचार कराल तेव्हा लक्षात ठेवा की तो दिवस शनिवार असावा.


ज्या हातात काळा धागा बांधला असेल त्या हातात इतर कोणत्याही रंगाचा धागा बांधणे अशुभ मानलं जातं. 


हातावर किंवा पायावर बांधण्यासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिंबासोबत काळा दोराही बांधू शकता. 


जर तुमच्या घरातील कोणी वारंवार आजारी पडत असेल तर शनिवारी हनुमानजींच्या पायाचं सिंदूर लावलेला काळा धागा गळ्यात घालावा. त्यामुळे आरोग्यात लवकरच सुधारणा दिसून येईल. म्हणून लक्षात ठेवा की कोणासाठी काळा धागा घालणे घातक ठरू शकते आणि लोकांनी नियमानुसार तो घातला पाहिजे. 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)