Astro Tips Kaala Dhaga : पायात काळा धागा बांधण्याचं जणू काही सध्या फॅशन (Fashion) आलं आहे. कारण बघावं तिकडे अनेकांच्या पायात काळा धागा (Black thread in leg) दिसतो. असं म्हणतात की काळा धागा बांधल्यास नजर लागतं नाही. म्हणजे वाईट नजरेपासून (evil eye) आपलं संरक्षण होतं. बाळ जन्माला आल्यापासून त्याचा हाता, पायात, कंबरेला अगदी गळ्यातही काळा धागा बांधला जातो. कारण गोंडस बाळा लगेचच नजर लागायची भीती असते.  घरातील मोठी मंडळी तरुणांनाही गळ्यात काळा धागा बांधण्यास सांगतात. 


ज्योतिषशास्त्रात काळ्या धाग्याचं महत्त्व


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रात शनीचा रंग हा काळा मानला जातो. काळ्या रंगाची कोणचीही वस्तू ही शनिला प्रिय असते. हिंदू धर्मानुसार काळा रंग हा शुभ नसतो. त्यामुळे काळा रंग हा नकारात्मक मानला जातो. त्यामुळे अनेक जण शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी काळा रंग वारतात.  (Black Thread Benefits on neck nmp) 


ज्योतिष शास्त्रानुसार शनि ग्रहापासून दुःख होत नाही तर माणसाच्या प्रगतीत मदत होते. त्यामुळे काळा रंग शनिला आकर्षित करतो म्हणून लोक गळ्यात काळा धागा घालतात. 



ज्योतिष शास्त्रामध्ये असा विश्वास आहे की काळ्या धाग्याने लहान मुलं आणि वृद्धांचे वाईट नजरेपासून संरक्षण होतं. लहान मुलांच्या गळ्यात काळा धागा घातला जातो कारण असं मानलं जातं की त्यांची तब्येत बिघडू लागते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)