मुंबई : जीवनात झाडं आणि वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वातावरण शुद्ध आणि चांगलं तर राहतंच, पण मनाला शांतीही मिळते. आजकाल हिरवळ प्रत्येकाला आवडते, सगळीकडे हिरवळ असावी असं अनेकांना वाटते. काही लोक निसर्गप्रेमी असतात. म्हणून ते त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये आणि घराच्या खिडक्यांमध्ये विविध झाडं सजवून ठेवतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुंदर झाडं देखील घराचं सौंदर्य वाढवतात. यासोबतच काही झाडं घरात असण्याने घरातील वातावरणही चांगलं राहतं. त्याचबरोबर धार्मिक दृष्टिकोनातूनही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. 


मात्र ज्योतिष शास्त्रानुसार, अशी काही झाडे आहेत जी घरात लावणं अशुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार या झाडांचा आणि वनस्पतींचा संबंध व्यक्तीच्या भाग्य आणि दुर्दैवाशी जोडला जातो. अशा परिस्थितीत ही झाडं घरात लावणं चांगलं मानलं जात नाही. ही झाडे घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. चला जाणून घेऊया त्या झाडांबद्दल आणि झाडे जी घरात लावू नयेत.


मेहंदीचं झाड


मेहंदीचे रोप घरामध्ये कधीही लावू नये. त्यातून नकारात्मक ऊर्जा मिळते. हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की, मेहंदीच्या रोपावर दुष्ट आत्म्यांची लवकर नजर जाते. अशा परिस्थितीत घरात मेहंदीचे रोप लावणं अशुभ मानलं जातं.


बोन्साय वनस्पती


बोन्साय रोप देखील घरात लावू नये. जरी हे झाड दिसायला सुंदर असेल पण ते घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. काही लोक घराच्या सजावटीत बोन्साय वनस्पती वापरतात. जर तुम्ही ही रोपे घरी लावली असतील तर आजच लावा. ज्योतिषशास्त्रानुसार, या वनस्पती प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात.


चिंचेच रोप


घरामध्ये चिंचेचे रोप लावणं देखील अशुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार चिंचेच्या रोपामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. यासोबतच ही वनस्पती कोणालाही भेट म्हणून देऊ नये. त्यामुळे भांडणं आणि वाद होऊ शकतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)