Brihaspati Nakshatra Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र आणि त्याचा तयार होणार योग या खूप महत्त्व आहे. बृहस्पती (Brihaspati Grah) म्हणजे गुरु ग्रह जो ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. 21 जूनला भरणी नक्षत्रात  (Bharani Nakshatra) गुरु ग्रहाने संक्रमण केलं असून 27 नोव्हेंबरपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. गुरूचा हा राशी बदलामुळे सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येणार आहे. पण खास करुन 4 राशींवर त्यांचा शुभ परिणाम दिसणार आहे. त्यांच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडणार असून सुख-समृद्धीसह धनलाभाचे योग जुळून आले आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यशाली राशी. (brihaspati nakshatra parivartan in bharani nakshatra guru gochar effects on all zodiac signs Astrology in marathi)


'या' राशींना होणार सर्वाधिक फायदा


धनु (Sagittarius)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृहस्पति नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांचे आयुष्य पलटणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना पगारवाढीसोबत बढती मिळणार आहे. पार्टनरशीपमध्ये बिझेनस करणाऱ्याचे अच्छे दिन सुरु होणार असून नवीन करार होणार आहे. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचा प्लन करणार आहात. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. 


कर्क (Cancer)


या राशीच्या लोकांची गुरु ग्रहाच्या संक्रमणादरम्यान व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. कुंडलीतील गुरुची स्थिती पाहता त्यांच्या नशिबात मालमत्ता किंवा नवीन कार खरेदीचे योग आहेत. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीसह नवीन जबाबदारी मिळणार आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढणार आहे. कोर्टात सुरू असलेली प्रकरणं तुमच्या बाजूने लागणार आहेत. तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखणार आहात.  


तूळ (Libra)


गुरु गोचरमुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती 27 नोव्हेंबरपर्यंत मजबूत राहणार आहे. ते ज्या कामात हात घालतील त्यात त्यांना यश प्रगती प्राप्त होणार आहे. नोकरी-व्यवसायात त्यांच्यासाठी अनेक फायदेशीर संधी तयार होणार आहेत. करिअरच्या प्रगतीसाठी तुमच्या अनेक योजना यशस्वी होतील. अध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढणार आहे. भावंडांचे या काळात पूर्ण सहकार्य मिळणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून 'या' राशींचा मंगलमय काळ! सुख समृद्धीसोबत धनलाभाचे अपार योग


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)