Mangal Or Budh Gochar 2022:  ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचराचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. प्रत्येक ग्रह आपापल्या निश्चित वेळेनुसार राशी बदलतो. 13 नोव्हेंबर रोजी मंगळ आणि बुध हे ग्रह वेगवेगळ्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळ वृषभ राशीत आणि बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. कोणत्या राशीच्या लोकांना या संक्रमणाचा फायदा होईल, जाणून घेऊयात..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. या काळात आरोग्यात सुधारणा होईल. तसेच, जीवनात अनेक नवीन संधी मिळतील. ज्या कामात तुम्ही हात लावाल, त्यात तुम्हाला यश मिळेल.


वृश्चिक - 13 नोव्हेंबर रोजी बुध ग्रह या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या संक्रमणामुळे या राशींच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायासाठीही हा काळ अनुकूल मानला जातो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे.


धनु - या राशीच्या लोकांच्या गोचर कुंडलीत सप्तम आणि दहाव्या भावात बुध ग्रहाचे भ्रमण होणार आहे. या काळात लोक व्यवसायात चांगला नफा कमावतील. या दरम्यान करिअरमध्येही चांगले परिणाम मिळू शकतात.


मकर - या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे संक्रमण लाभदायक ठरेल. या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. त्याचबरोबर संशोधनाशी संबंधित लोकांसाठी मंगळाचे संक्रमण लाभदायक आहे.


गुरुवारी पिवळ्या रंगाचं महत्त्व का आहे? या वस्तूंचं दान केल्यास मिळतो लाभ, जाणून घ्या


कुंभ - या राशीच्या लोकांसाठी 13 नोव्हेंबर नंतरचा काळ अनुकूल आहे. या लोकांच्या कुंडलीत पाचव्या आणि आठव्या स्थानाचा स्वामी बुध आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात शुभ परिणाम मिळू शकतात. या दरम्यान घरातही शांत वातावरण राहील.


कर्क - या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ ठरू शकते. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळतील. त्याच वेळी अडकलेली कामे मार्गी लागतील.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)