Budh Gochar 2023 in marathi : प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सर्वात वेगाने बदलणारा ग्रह आहे. 27 फेब्रुवारीला बुध गोचर होऊन कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 6 मार्चला शनिचा उदय होईल आणि त्यापूर्वी बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे शनीच्या राशीत बुधाचा प्रवेश सर्व लोकांच्या जीवनात मोठा परिणाम करणार आहे. बुधाच्या राशी बदलामुळे लोकांच्या करिअर, व्यवसाय, वाणी आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होणार आहे. (Budh Gochar 2023 Mercury Transit 2023 in Kumbh golden days and lot of money to these zodiac in marathi)


बुध गोचरमुळे 'या' राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार


वृषभ (Taurus)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांच्या करिअरसाठी बुधाचं संक्रमण खूप चांगलं राहील. त्यांना नोकरीत मोठी संधी मिळू शकते. नवीन नोकरीत सहभागी होऊ शकता. इच्छित पगार आणि पद मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या जबाबदाऱ्या आणि प्रभाव वाढेल. उत्पन्नात मोठी वाढ होईल. हा काळ व्यावसायिकांनाही मोठा लाभ देईल. त्याचा व्यवसाय वेगाने वाढेल. एकंदीत या राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. 


सिंह (Leo)


बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना शुभ फळ मिळणार आहे. या लोकांचं वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन खूप चांगल राहणार आहे. त्यांच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांना मोठा लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना चांगले यश मिळेल. बढती-वाढ मिळेल. भागीदारीमध्ये काम सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. 


मकर (Capricorn)


शनि हा मकर राशीचाही स्वामी असून बुध शनीच्या राशीत प्रवेश करत आहे. यामुळे मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरेल. या लोकांना अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. संपत्ती आणि मालमत्तेची गुंतागुंतीची प्रकरणे सुटतील. व्यवसायात तेजी येईल. जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होईल. पण तब्येतीची काळजी घ्या, अन्यथा गडबड होऊ शकते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)