Budh Gochar 2024 nakaratmak prabhav : ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध शुक्रवारी 14 जूनला रात्री 11:09 वाजता मिथुन प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत तो 29 जूनला रात्री 12:29 पर्यंत असणार आहे. बुध ग्रहाच्या गोचरमुळे काही लोकांसाठी अच्छे दिन तर काहींसाठी कठीण काळ सुरु होणार आहे, असं भाकीत ज्योतिषचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी केलं.  बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर 4 राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असून 14 जूनपासून त्यांच्यासाठी कठीण काळ सुरू होणार आहे. बुधाच्या नकारात्मक प्रभावामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकतं शिवाय आर्थिक नुकसानीसोबतच नातेसंबंधांवरही वाईट परिणाम दिसून येणार आहे.


बुधाचे संक्रमण 'या' 4 राशींसाठी घेऊन येईल टेन्शन!


कर्क (Cancer Zodiac)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध गोचरमुळे तुमच्या आर्थिक गणित बिघडणार आहे. तुमच्याकडे पैशांची कमतरता असणार आहे. या काळात तुमचं खर्च देखील दुप्पटीने वाढणार आहे. ज्यामुळे तुम्हाला इतरांकडून पैसे घ्यावे लागणार आहेत. या काळात तुम्हाला फालतू खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तर तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांची काळजी घ्यावी लागणार आहे. कोणाशीही वाद घालू नका आणि अनावश्यक वादात पडू नका, ते तुमच्यासाठी चांगले ठरेल. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


मिथुन राशीत बुधाच्या प्रवेशामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल, मात्र यासाठी तुम्ही अवैध मार्गांचा अवलंब करणार आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे तुमच्यासाठी मोठे नुकसानदायक ठरणार आहे. तुम्ही अनैतिक कृत्यांपासून दूर राहणे तुमच्या हिताचं ठरेल. कामावरील सहकारी तुमचा मत्सर करणार आहे. तुम्हाला तुमचे काम गुप्तपणे करावे लागणार आहे. या काळात तुमच्या विरोधकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 14 जूनपासून बुधाचे संक्रमण तुमच्या आरोग्यावर आणि वैवाहिक जीवनावर नकारात्मक ठरणार आहे. तुमच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या जोडीदाराला वेळ देणे गरजेचे आहे. 


मकर (Capricorn Zodiac)   


बुधाचा राशी बदल तुमच्या आयुष्यात नवीन आव्हाने घेऊन येईल. या काळात तुम्हाला जास्त राग येणार आहे. तुम्ही कामात घाई करुन चालणार नाही. संयमाचा अभाव आणि वाणीवर नियंत्रण नसल्यामुळे काम बिघडणार आहे. निरर्थक वादविवादांपासून दूर राहणे हिताच ठरेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आत्ताच तसे करू नका. हा तुमच्यासाठी चुकीचा निर्णय ठरु शकतो. प्रेम जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवा तर बरं होईल. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा जोडीदारासोबत गोष्टी स्पष्ट करा. अन्यथा, गैरसमजामुळे नात्यात तणाव निर्माण होईल. 14 जून ते 29 जून दरम्यान कोणतेही कर्ज घेऊ नका. 


मीन  (Pisces Zodiac)  


बुध राशीतील बदल तुमच्या प्रेम जीवनासाठी कठीण असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत विश्वासाचा अभाव तुम्हाला तणावात टाकणार आहे. तुमच्या जोडीदाराला गुणवत्तापूर्ण वेळ दिला तर बरं होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात प्रवास टाळावा. कोणतेही काम अर्धवट मनाने करू नका, ते अयशस्वी होणार नाही. मेहनतीमुळे यश मिळणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)