Budh Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धिमत्ता आणि तर्काचा स्वामी मानला जातो. पुढच्या आठवड्यात बुध गोचर करणार आहे. बुध ग्रह 24 जून रोजी दुपारी 12:35 वाजता त्यांची स्वतःची राशी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 8 जुलैपर्यंत बुध या राशीत राहणार आहे. या दरम्यान या गोचरचा काही राशींवर परिणाम होणार आहे. यामध्ये काही राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 


मेष रास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष राशीच्या तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी बुध ग्रह आहे. मिथुन राशीत बुधाचे संक्रमण तृतीय भावात असणार आहे. बुधाच्या गोचरमुळे परदेश दौऱ्यावर जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. जीवनातील महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मार्केटिंग व्यवसायाशी संबंधित असाल तर तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा खर्चही लक्षणीय वाढू शकतो. 


वृषभ रास


वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध हा दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. कौटुंबिक वादही सोडवता येणार आहेत. व्यवसायात लाभाच्या संधी मिळणार आहे.  या दरम्यान, सर्व कामांमध्ये अनुकूल परिणाम दिसून येणार आहेत. 


मिथुन रास


बुध ग्रहाची ही स्वराशी आहे. बुधाच्या गोचरमुळे समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळणार आहे. शिवाय यामुळे तुमचे सर्व आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्न सोडवले जाणार आहेत. जर तुमच्या जोडीदारासोबत मतभेद झाले असतील तर ते दूर होऊ शकणार आहेत. धनप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील.


सिंह रास


बुधाच्या गोचरचा सकारात्मक परिणाम या राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. तुम्हाला तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. पूर्वीपासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येण्याची शक्यता आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )