Grah Gochar January 2025 In Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. ते बुद्धिमत्ता, वाणी आणि तर्काचे कारक मानले जातात. असे म्हटले जाते की जोपर्यंत बुध ग्रहाचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत कोणताही मनुष्य जीवनात यश मिळवू शकत नाही. जेव्हा पत्रिकेत बुधाची स्थिती मजबूत असेल तर व्यक्ती नेहमीच यश मिळवेल. पण जर बुधाचे स्थान कमजोर असेल तर त्या व्यक्तीला नुकसान आणि निराशा सहन करावी लागेल. ते सौरमंडळात सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रहदेखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध प्रत्येक अडीच दिवसांत त्याची रास बदलतो. त्यांचा हा गोचरदेखील सर्व 12 राशींवर प्रभाव टाकतात. आता नवीन वर्षातदेखील पुन्हा एकदा गोचर बनणार आहे. हे 2025मध्ये पहिले गोचर असणार आहे. ज्योतिषशास्त्रांनुसार, बुध महाराज 4 जानेवारी 2025 ला सकाळी 11.55 वाजता धनु राशीत गोचर करेल. या गोचरमुळं 4 राशींना विशेष लाभ होणार आहे. 


सिंह 


ज्या व्यक्ती जुनाट आजारांचा सामना करत आहेत. त्यांना 4 जानेवारीपासून दिलासा मिळू शकतो. जर तुम्ही ट्रेडिंग किंवा शेअरमध्ये काम करत आहात तर बुध गोचर झाल्यानंतर तुम्हाला फायदा मिळू शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही असंतुष्ट असाल तर नवीन ठिकाणी तुम्हाला संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या मुलाच्या आभ्यासातील प्रगती पाहून संतुष्ट व्हाल. या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 


कन्या


तुमच्यासाठीदेखील हे गोचर खूप फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही आनंदाचे क्षण व्यतित कराल. तुमच्या घरात अनेक मौल्यवान वस्तु येतील. ज्यामुळं सुख-सुविधा वाढेल. तुमचं आरोग्यदेखील उत्तम राहिलं. तुम्हाला नोकरीची चांगली संधी चालून येईल. व्यवसायात मात्र तुम्हाला अपेक्षेप्रमाणे नफा मिळणार नाही. यात तुमचा थोडा अपेक्षाभंग होउ शकतो.


तुळ


वर्षातील पहिले गोचर या राशीच्या व्यक्तींची पद-प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनतीचे कौतुक सर्व सहकारी करतील. तुम्हाला सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळु शकते. तिथे तुम्हाला सन्मानित करण्यात येईल. तुमच्या व्यवसायात नफा मिळेल ज्याचा तुम्हालाच फायदा होईल. 


मकर 


ग्रहांचे युवराज बुध तुमच्यासाठी अपार धनलाभ योग घेऊन येणार आहे. तुमच्या आर्थिक स्थिती सुधारेल. ज्या व्यक्तींनी कर्ज घेऊन ठेवलेले आहे त्यांना हळुहळु त्यातून मुक्ती मिळेल.  कामाच्या संदर्भात तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तिथे तुमची अनेक लोकांसोबत मैत्री होईल. वाईट काळात ते लोक तुमचे जवळचे लोक होऊ शकतात. तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवा अन्यथा नुकसान होऊ शकते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)