Budh Asta 2023: नववर्ष सुरु झालं असून नव्या संकल्पासह अनेकांनी जोमाने सुरुवात केली आहे. मात्र या काळात ग्रहांची साथ मिळणार का? याकडेही जातकांचं लक्ष लागून आहे. 2 जानेवारी 2023 रोजी बुध ग्रह धनु राशीत अस्ताला जाणार आहे. बुध ग्रह गोचर करताना सूर्याजवळ आल्याने तेज कमी होतं आणि अस्ताला जातो. 2 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी बुध अस्त होणार आहे. 11 दिवस बुध ग्रह या स्थितीत असणार आहे. म्हणजेच 13 जानेवारी 2023 रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. या स्थितीत 11 दिवस काही राशींनी सांभाळून राहणं आवश्यक आहे. ज्योतिषांच्या मते काही राशींना या स्थितीत सावध पावलं टाकणं गरजेचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- बुध सध्या धनु राशीत असल्याने मेष राशीच्या नवव्या स्थानात विराजमान आहे.  त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीवर लगेच आक्रमक होऊ नये तसेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं. खासगी आणि प्रोफेशनल लाईफमध्ये त्रास होऊ शकतो. तसेच आरोग्यविषयक अडचणी सहन कराव्या लागू शकतात.


मिथुन- बुध या राशीच्या सातव्या स्थानात अस्त होणार आहे. त्यामुळे नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर 11 दिवस जरा सांभाळून राहावं. तुमचं लग्न झालं असेल तर घरात वादविवाद होऊ शकतात. आई आणि बायकोचं पटणार नाही असं चित्र आहे. प्रेम संबंधात अडचणी निर्माण होऊ शकतात.


सिंह- बुध ग्रह सिंह राशीच्या पाचव्या स्थानात अस्ताला जाणार आहे. त्यामुळे या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत नुकसान होऊ शकतं.


धनु- बुध ग्रह सध्या या राशीत असून अस्ताला जाणार आहे. त्यामुळे या काळात आरोग्यविषयक अडचणी सहन कराव्या लागू शकतात. कामाच्या ठिकाणी अपमान सहन करावा लागू शकतो. त्यामुळे व्यवहार आणि वाणीवर नियंत्रण ठेवावं.


बातमी वाचा: Venus Transit : शनिच्या राशीत शुक्रानं मारली एन्ट्री, 'या' राशींसाठी प्रवेश ठरणार लाभदायी


कुंभ- बुध ग्रह या राशीच्या 11 व्या स्थानात अस्थाला जाणार आहे. या काळात केलेली गुंतवणूक अडचणीची ठरू शकते. त्यामुळे गुंतवणुकीचा निर्णय जरा लांबणीवर ढकला. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्यांना नकारघंटा ऐकायला मिळू शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)