Budh Margi 2022: 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत `या` राशींना मिळणार बुध ग्रहाची साथ, आर्थिक स्थिती सुधारणार
12 राशी आणि ग्रह यांचं नातं असून गोचराचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे (Grah Gochar) ज्योतिषांचं लक्ष लागून असते.
Budh Margi Impact 2022: 12 राशी आणि ग्रह यांचं नातं असून गोचराचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे (Grah Gochar) ज्योतिषांचं लक्ष लागून असते. सध्या सणासुदीचे दिवस असून बुध ग्रह कन्या राशीत मार्गी झाला आहे. बुध (Budh Grah Margi) हा बुद्धीचा आणि धनसंबंधी ग्रह मानला जातो. त्यामुळे बुध ग्रह मार्गी झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम काही राशींवर दिसून येणार आहे. दिवाळीपूर्वी बुध ग्रहाचा 4 राशींवर प्रभाव दिसून येईल. चला जाणून घेऊयात 15 दिवस कोणत्या राशींसाठी फलदायी ठरतील जाणून घेऊयात.
वृश्चिक- बुध ग्रह वृश्चिक राशीच्या (Vrushchik) 11 व्या स्थानात आहे. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. तसेच समाजात मानसन्मान मिळेल. या काळात अडकलेली कामं मार्गी लागतील. स्वभावात सकारात्मक परिणाम दिसून येईल.
कन्या- बुध ग्रह 2 ऑक्टोबरला कन्या (Kanya) राशीत मार्गी झाला आहे. या राशीतील लग्ननभावात बुध मार्गी झाला आहे. त्यामुळे सकारात्मक बदल दिसून येईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. तसेच आक्समितपणे धनलाभ होऊ शकतो.
कर्क- बुध ग्रह कर्क (Kark) राशीच्या तिसऱ्या स्थानात मार्गी झाला आहे. त्यामुळे पुढचे 15 दिवस या राशीसाठी चांगले आहेत. नात्यात गोडवा निर्माण होईल. करिअरसाठी हा काळ चांगला आहे. या काळात काही महत्त्वाची माहिती मिळू शकते.
शनिदेवांना हे फूल आहे प्रिय! देवी-देवतांना आवडीची फुले वाहून मिळवा आशीर्वाद
मिथुन- ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा मिथुन (Mithun) राशीचा स्वामी आहे. कन्या राशीत बुध गेल्याने या राशीच्या लोकांसाठी वाहन खरेदीची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनही आनंदी राहील. दिवाळीपर्यंतचा काळ व्यावसायिकांसाठीही अनुकूल आहे. या काळात काही नवीन ऑर्डर मिळू शकतात.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)