मुंबई : ग्रहांचा राशींवर होणार परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पाडत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार कोणताही ग्रह जेव्हा राशी राशीत बदल करतो. तेव्हा त्याचा प्रभाव 12 राशींवर होतो. हा प्रभाव कधी शुभ तर कधी अशुभ असतो. ग्रहांचा राजकुमार समजला जाणारा 'बुध' 29 डिसेंबर रोजी राशी बदलणार आहे. बुध ग्रह धनू ते मकर असा 11 वाजून 40 मिनिटांनी प्रवास करणार आहे. धनुचे हे परिवर्तन 3 राशींकरता लाभदायक असणार आहे. 


वृषभ (Taurus): 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ राशीच्या लोकांकरता बुधचं राशी परिवर्तन चांगले असणार आहे. बुध गोचराच्या दरम्यान कायद्याच्या गोष्टींमध्ये लाभ होणार आहे. सोबतच मेहनतीचा संपूर्ण लाभ होणार आहे. यासोबतच कौटुंबिक गोष्टीतून समाधा मिळेल. आर्थिक समृद्धी मिळणार आहे. ज्यामुळे जीवन सुखी होईल. 


वृश्चिक (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांकरता बुधचे गोचर हे शुभ आणि फलदायी असणार आहे. बुध गोचरासोबतच सर्व मोनकामना पूर्ण होणार. यासोबतच नोकरीच्या परिवर्तनासोबत आर्थिक उन्नती होणार आहे. नोकरी बदलण्यासाठी ही उत्तम संधी आहे. सोबतच प्रमोशनचे संकेत देखील आहे. जे लोक सरकारी नोकरीत आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी अधिक शुभ आहे. अचानक धनलाभ होईल. 


धनू (Sagittarius) : 


धनू राशीच्या लोकांकरता आजचा बुध काळ शुभ असणार आङे. बुधच्या या काळात कामात कुशलता प्राप्त होईल. नोकरीत अधिकारी कामाची प्रशंसा करतील. यासोबतच बिझनेसमध्ये वाढ होईल. तसेच कोणत्याही कामातील गुंतवणूक लाभदायकच ठरणार आहे.