मुंबई : मकर राशीमध्ये बुध आणि शनी ग्रह राहणार आहे. ही स्थिती 4 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर कसा होणार? कोणत्या राशीसाठी पुढचे 20 दिवस अधिक कठीण असणार आणि कोणत्या राशीवर चांगला परिणाम होणार हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : करियरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायातील गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल.


वृषभ :  मन प्रसन्न राहील. नोकरीच्या संदर्भात परदेशातून संधी मिळेल. बुधाचा राशी बदल या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल.


मिथुन :  भौतिक सुख मिळेल. व्यवसाय किंवा करिअरच्या नियोजनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.मानसिक दबाव जाणवू शकतो.


कर्क : जुने वाद पुन्हा अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. खर्चात मोठी वाढ होऊ शकते. करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात.


सिंह :  कुटुंबात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी हा काळ फार उत्तम आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलताना शब्द जपून वापरा. 


कन्या : जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्यांबाबत सावधगिरी बाळगा.


तुळ :  घरगुती कामात उधळपट्टी वाढेल. घरातील बांधकामाची कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील.


वृश्चिक :  प्रवासात नुकसान होऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक प्रवास करा. याशिवाय आवश्यक कागदपत्रांची काळजी घ्यावी लागेल. हा काळ धोक्याचा आहे त्यामुळे या काळात आपलं नुकसान कसं होणार नाही याची काळजी घ्या. 


धनु  : आर्थिक मुद्द्यांवर सावधगिरी बाळगणे योग्य राहील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. नोकरीत आर्थिक प्रगती होईल. रागावर नियंत्रण ठेवा.


मकर : स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे. राग आणि चिडचिड होणार नाही याची काळजी घ्या. काहीतरी मोठी घटना तुमच्या आयुष्यात घडण्याची शक्यता आहे. 


कुंभ :  पैशाच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. आर्थिक नुकसानीचे योग आहेत. व्यवसायिकांना मोठा फायदा याच काळात होण्याची शक्यता आहे. 


मीन : चुकीच्या निर्णयामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. शिक्षणात काही अडथळे येऊ शकतात.