Surya Gochar : सूर्य देव हे ग्रहांचे राजा मानले जातात. ज्योतिष्य शास्त्रानुसार, सूर्य देव दर महिन्याला त्यांची राशी बदलतात. येत्या 15 जून रोजी सूर्यदेव गोचर करणार आहेत. यावेळी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचं हे गोचर फार महत्त्वाचं मानलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्याच्या गोचरचा 12 राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. सूर्यानंतर 24 मे रोजी बुध ग्रह देखील याच राशीत येणार असल्याने त्याची शनिशी युती होणार आहे. यावेळी बुधादित्य राजयोग आणि शनीच्या संयोगाने नवपंचम राजयोग निर्माण होतोय. या दोन्ही राजयोगांचा एकत्रित परिणाम काही राशींवर होणार आहे. 


ज्योतिषशास्त्रामध्ये हे दोन्ही योग अतिशय शुभ मानले जातात. या दोन्ही राजयोगांचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे, ते पाहूयात. 


मेष


सूर्याचं गोचर मेष राशींच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रातही नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. अचानक आर्थिक लाभाचेही संकेत आहेत. तुम्हाला परदेशी जाण्याची इच्छा असेल तर तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. बिझनेसमधून भरपूर पैसै मिळणार आहेत. 


सिंह


सूर्याला सिंह राशीचा स्वामी मानलं जातं. त्यामुळे सूर्य गोचरच्या वेळी तयार होणारे हे दोन्ही योग या लोकांसाठी शुभ राहणार आहेत. यावेळी तुम्ही आर्थिक अडचणींवर मात करू शकणार आहात. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. समाजात आदर वाढू शकणार आहे. नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना मनाप्रमाणे नोकरी मिळणार आहे. 


मकर 


सूर्य गोचर मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. परिणामी आर्थिक बाबतीत मजबूत राहू शकणार आहात. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिक्षांमध्ये चांगलं यश मिळू शकणार आहे. 


मीन


सूर्याचे हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी समृद्धी आणणार असणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनातील कटुता दूर होणार आहे. कौटुंबिक नात्यात बळ येणार आहे. व्यापाऱ्यांना नफा कमावता येईल. तुम्हाला महत्त्वाच्या कामांमध्ये वडीलांचं सहकार्य लाभणार आहे.  


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )