Budhaditya Rajyog :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह ठराविक काळानंतर आपली स्थिती बदलतात. प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी 12 राशींमधून भ्रंमण करत असतो. अशात राशीत अनेक वेळा एकापेक्षा जास्त ग्रहांचं मिलन होतं. त्यातून काही शुभ किंवा कधी अशुभ योग निर्माण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार 1 फेब्रुवारीला बुद्धीचा दाता बुध मकर राशीत गोचर करणार आहे. मकर राशीत आधीपासून ग्रहांचा राजा सूर्यदेव विराजमान आहे. यामुळे मकर राशीत बुध आणि सूर्य संयोगामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. याचा फायदा काही राशींना बंपर होणार आहे. (Budhaditya Rajyog Sun and Mercury conjunction or surya and budh yuti in Aquarius after 1 year Rain of money on these zodiac signs) 


मेष रास (Aries Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या दहाव्या घरात बुधादित्य योग निर्माण होणार आहे. हा योग मेष राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसणार आहे . करिअरच्या क्षेत्रात अतुलनीय यश मिळणार आहे. यासोबतच परदेशातून नोकरीच्या संधी मिळणार आहेत. तुमच्या कामाची आणि मेहनतीची प्रशंसा होणार आहे. यासोबतच तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य लाभणार आहे. तुम्ही तुमच्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणार आहात. व्यवसायिकांना मोठा नफा मिळणार आहे. 


वृषभ रास (Taurus Zodiac) 


या राशीमध्ये नवव्या घरात बुधादित्य योग निर्माण होणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक भरघोस आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या भविष्याचा विचार करताना तुम्ही काही चांगले काम करु शकणार आहे. यासोबतच तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नोकरीत बढतीसोबत पगार वाढ मिळणार आहे. यासोबतच तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुम्ही चांगली कमाई करणार आहात. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  


बुधादित्य राजयोग या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाने बहरणार आहे. यातून अनेक प्रयत्नांत प्रगती साधता येते. यासोबतच तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे. यासोबतच परदेशातून नोकरी मिळवण्याची संधी आहे. यासोबतच नोकरीत प्रमोशन मिळण्याची पूर्ण शक्यता निर्माण होणार आहे. यासोबतच वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)