Budhaditya Yog: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष्य शास्त्रामध्ये, सूर्याला ग्रहांचा राजा मानलं आहे. सूर्याच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. येत्या काळात सूर्याच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार 7 मार्च रोजी सकाळी 09:21 वाजता ग्रहांचा राजकुमार बुध मीन राशीत गोचर करणार आहे. यासोबतच 14 मार्चला ग्रहांचा राजा मीन राशीत येणार आहे. ज्यामुळे सूर्य आणि बुधाचा संयोग होतोय. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे बुधादित्य नावाचा राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


वृषभ रास (Vrishbha Zodiac)


या राशीमध्ये अकराव्या घरात बुधादित्य योग तयार होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात आनंद राहील आणि समाजात मान-सन्मान वाढणार आहे. या काळात तुम्ही तुमचे पालक किंवा त्यांच्या नातेवाईकांमार्फत लाभ मिळवू शकता. करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली होणार आहे. या काळात तुमची बचतही वाढू शकते. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


या राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बनलेला बुधादित्य योग या राशीच्या लोकांना बंपर लाभ देऊ शकतो. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना मेहनतीचा पुरेपूर फायदा मिळणार आहे. परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेशात व्यवसाय करणे देखील फायदेशीर ठरू शकतं. तुमच्या जोडीदारासोबतही तुमचा वेळ चांगला जाईल.


कन्या रास (Kanya Zodiac)


बुधादित्य योगामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊन आनंद मिळू शकतो. परदेशात सुरू असलेल्या व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. या काळात आरोग्य चांगले राहणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते टिकवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. अनेक दिवसांपासून असलेल्या इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)