Shani In Purva Bhadrapada Nakshatra: ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी शनि हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. 6 एप्रिल रोजी दुपारी 3:55 वाजता शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आणि 3 ऑक्टोबरपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. परंतु या नक्षत्रातील टप्पे वेळोवेळी बदलत राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनीने 12 मे रोजी पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या पदात प्रवेश केला होता. तर 18 ऑगस्ट रोजी रात्री 10.03 पर्यंत या चरणात राहणार आहे. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. जाणून घेऊया पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात शनीच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना लाभ मिळू शकणार आहे.


मेष रास (Mesh Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय स्थानात शनीचा प्रवेश लाभदायक ठरू शकणार आहे. आर्थिक तंगीपासून दिलासा मिळेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरदार लोकांनाही लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे. नातेसंबंधात अधिक मजबूत दिसेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. 


कन्या रास (Kanya Zodiac)


पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात शनीचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात. आता जुन्या गुंतवणुकीत यश मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कामानिमित्त काही प्रवास करावा लागू शकतो. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. अनावश्यक खर्चातून सुटका होऊ शकते.


कुंभ रास (Kumbha Zodiac)


पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कामानिमित्त परदेश प्रवास होऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात केलेल्या मेहनतीचा फायदाही मिळेल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )