Samsaptak Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतता. यावेळी डिसेंबर हा खूप खास आहे, कारण वर्षभरात तयार न झालेले सर्व राजयोग या महिन्यात तयार होणार आहेत. वर्षाच्या अखेरच्या काळात म्हणजे 25 डिसेंबरला संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे गुरू ग्रह देखील मेष राशीमध्ये स्थित आहे. अशा स्थितीत गुरू आणि शुक्र समोरासमोर आल्याने समसप्तक योग तयार होणार आहे. यावेळी हा योग अत्यंत शुभ मानला जातो. हा योग तयार झाल्यामुळे नवीन वर्षात काही राशीच्यांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. जाणून घेऊया समसप्तक योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.


कन्या रास (Kanya Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष खूप खास असू शकणार आहे. समसप्तक राजयोग या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकतो. प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात अपार यशासह लाभाची शक्यता दिसत आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. वैवाहिक जीवनही चांगले जाणार आहे.


मकर रास (Makar Zodiac)


मकर राशीच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग चांगला सिद्ध होऊ शकणार आहे. पुन्हा एकदा व्यवसाय सुरळीत सुरू होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. अपेक्षित पदोन्नती किंवा पगारात वाढ होऊ शकते.


कुंभ रास (Kumbha Zodiac)


कुंभ राशीच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग वरदानापेक्षा कमी नसणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. यावेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. वडील आणि मित्रांच्या मदतीने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येणार आहे. यासोबतच सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )