Chaitra Navratri 2023 Date in marathi : शक्तीच्या उपासनेचा सण चैत्र नवरात्री काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चैत्र महिन्याला सुरुवात झाली असून माँ दुर्गेच्या 9 रुपांची पूजा करण्याचा सण...यंदाचा चैत्र नवरात्री खूप महत्त्वाची आहे. कारण या 9 दिवसात  9 दुर्मिळ योगायोग जळून आले आहेत. असा हा सोहळा कधी आहे आणि शुभ मुहूर्तबद्दल जाणून घेणार आहोत. (chaitra navratri 2023 dates time shubh muhurat 9 auspicious yogas and Goddess upay in marathi) 



कधी आहे चैत्र नवरात्री? (Navratri 2023 dates)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदय तिथीनुसार चैत्र नवरात्रीची सुरुवात 22 मार्च 2023 पासून सुरुवात होणार आहे. तर रामनवमीच्या (ram navratri 2023) दिवशी म्हणजे 30 मार्चला नवरात्रीची समाप्ती होईल.  


चैत्र नवरात्री शुभ मुहूर्त (chaitra navratri 2023 shubh muhurat)


शुभ मुहूर्त - 22 मार्च 2023 ला सकाळी 06:29 ते 07:39 पर्यंत


अमृत काल - 22 मार्च 2023 ला  सकाळी 11.07 ते 12:35 पर्यंत


चैत्र नवरात्रीत घडणार 9 दुर्मिळ योगायोग!


यंदा नवरात्रीचे नऊ दिवस 9 दुर्मिळ योगायोग घडणार आहेत. शनि आणि मंगळ मकर राशीत असणार आहे. तर रवि पुष्य नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग जुळून येतं आहे. याशिवाय मीन राशीत सूर्य-बुध संयोगाने बुधादित्य योग तयार होतो आहे. हा योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 


'हे'  उपाय केल्यास होईल धनवर्षा


- नवरात्रीच्या काळात घर स्वच्छ ठेवा आणि घरात गंगेचे पाणी शिंपडा. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक प्रगती होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. 


- नवरात्रीच्या दिवसात देवीसोबत गणपतीची पूजा आर्वजून करा. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. 


- हिंदू धर्मात तुळशाला अत्यंत पवित्र मानलं जातं. नवरात्रीमध्ये घरामध्ये तुळशीचं रोप लावा. 


- नवरात्रीमध्ये कलश स्थापनेला महत्त्व आहे. असं केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा आणि आनंद राहतो. 


- नवरात्रीच्या दिवशी पिठाचा गोळा तयार करुन वाहत्या पाण्यात अर्पण करा. असं केल्याने जीवनात समृद्धी येते, ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 


- कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात देवीच्या मंदिरात दररोज गोड पेय अर्पण करा. 


 


हेसुद्धा वाचा - Navratri 2023 : यंदा नवरात्रीत ग्रहांचा दुर्मिळ संयोग, कधी आहे चैत्र नवरात्र? जाणून शुभ मुहूर्त आणि विधी


 


(वरील माहितीचा कोणताही पुरावा नसल्यामुळं ती केवळ सर्वसामान्य संदर्भांआधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)