Chaitra Navratri 2024 : यंदा घोड्यावर स्वार होऊन येणार माँ दुर्गा, कधी आहे चैत्र नवरात्री? घटस्थापना मुहूर्त, महत्व जाणून घ्या
Chaitra Navratri Date : हिंदू धर्मात चैत्र महिन्याला अतिशय महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र हा वर्षातील पहिला महिना मानला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरूवात होतं असते.
Chaitra Navratri Date : हिंदू पंचांगानुसार वर्षभरात 4 नवरात्र येत असतात. यातील दोन या गुप्त नवरात्री असतात तर दोन शारदीय आणि चैत्र नवरात्र असते. गुप्त नवरात्र ही तंत्र साधनेसाठी शुभ मानली जाते. तर शारदीय आणि चैत्र ही गृहस्थ भक्त साजरी करतात. देशभरात शारदीय नवरात्राचा मोठ्या उत्साह आपण पाहतो. तर चैत्र नवरात्रीलादेखील देशात देवींच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा कधी आहे चैत्र नवरात्री जाणून घ्या. (Chaitra Navratri 2024 date Maa Durga will come riding a horse this year when is Chaitra Navratri Know Ghatasthapana Muhurat Significance)
चैत्र नवरात्र 2024 कधी आहे?
हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी ही 8 एप्रिल 2024 ला रात्री 11:50 वाजता सुरु होणार असून 9 एप्रिलला रात्री 8:30 वाजेपर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, चैत्र नवरात्री 9 एप्रिल 2024 पासून साजरी करण्यात येणार असून 18 एप्रिल महानवमी असणार आहे. मंगळवार, 9 एप्रिल 2024 ला गुढीपाडवा सणदेखील आहे. गुढीपाडवा हा मराठी लोकांचा नवीन वर्षाची सुरुवात असते.
चैत्र नवरात्री घटस्थापना मुहूर्त 2024
चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 9 एप्रिलला सकाळी 6:11 ते 10:23 वाजेपर्यंत असणार आहे. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त 9 एप्रिलला दुपारी 12:03 ते 12:54 वाजेपर्यंत आहे. चैत्र नवरात्रीत घटस्थापना करुन 9 दिवस उपवास केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
चैत्र नवरात्रीचे 9 दिवस आणि तारीख
चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस – 09 एप्रिल 2024, मंगळवार – माँ शैलपुत्री पूजा, घटस्थापना
चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस - 10 एप्रिल 2024, बुधवार - माँ ब्रह्मचारिणी पूजा
चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस - 11 एप्रिल 2024, गुरुवार - माँ चंद्रघंटा पूजा.
चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस - 12 एप्रिल 2024, शुक्रवार - माँ कुष्मांडा पूजा
चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस - 13 एप्रिल 2024, शनिवार - माँ स्कंदमाता पूजा
चैत्र नवरात्रीचा सहावा दिवस - 14 एप्रिल 2024, रविवार - मां कात्यायनी पूजा
चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस – 15 एप्रिल 2024, सोमवार – माँ कालरात्री पूजा
चैत्र नवरात्रीचा आठवा दिवस - 16 एप्रिल 2024, मंगळवार - माँ महागौरी पूजा आणि दुर्गा महाअष्टमी पूजा
चैत्र नवरात्रीचा नववा दिवस - 17 एप्रिल 2024, बुधवार - माँ सिद्धिदात्री पूजा, महानवमी आणि राम नवमी
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)