Chaitra Navratri 2023 Ashtami and Navami Shubh Muhurat : सगळीकडे चैत्र नवरात्रीचा उत्साह दिसून येतं आहे. नवरात्रीमध्ये देवाच्या नऊ रुपाची पूजा...ज्योतिषशास्त्रानुसार या नऊ देवात देवी मातेच्या नऊ रुपाची मनोभावी पूजा केल्यास तुम्हाला देवीचा आशीर्वाद लाभतो. या चैत्र नवरात्रीच्या अष्टमीला कन्या पूजन केलं जातं. असं म्हणतात लहान मुलींमध्ये देवीचा वास असतो. म्हणून अष्टमीला देवीच्या रुपाचं म्हणजे कन्या पूजन करण्याची परंपरा आहे. यावेळी नवरात्रीमध्ये ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती अतिशय शुभ ठरली आहे. दुसरीकडे, अष्टमी आणि नवमी तिथीला शुभ योगांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. (Chaitra Navratri Ram Navami 2023 Date Shubh Yoga tithi pujan muhurat in marathi)


अष्टमी तारीख 2023 (Chaitra Navratri ashtami 2023 Date)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा अष्टमी कधी आहे असा प्रश्न भाविकांना पडला आहे. कारण अष्टमी तिथी 28 तारखेला सुरु होते आहे. त्यामुळे अष्टमी 28 की 29 नेमकी कधी साजरा करायची असा संभ्रम भाविकांमध्ये आहे. तर हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्रीमध्ये 29 मार्च 2023 ला महाअष्टमी आहे. चैत्र शुक्ल अष्टमी तिथी 28 मार्च 2023 ला सायंकाळी 7:02 वाजता सुरू होणार आहे. 29 मार्च 2023 ला रात्री 9:07 वाजता समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार दिवस साजरा केला जातो. उदय तिथीनुसार 29 मार्च 2023 ला दुर्गा अष्टमी साजरी केली जाणार आहे. 


अष्टमी शुभ योग (Chaitra Navratri ashtami Shubh Yoga)


या अष्टमी तिथीला शोभन योग आणि रवि योग तयार होत आहेत. 28 मार्चच्या रात्री 11.36 ते 29 मार्चच्या सकाळी 12:13 पर्यंत शोभन योग राहील. दुसरीकडे, रवि योग 29 मार्चच्या रात्री 08:07 ते 30 मार्चच्या सकाळी 06:14 पर्यंत राहील. या योगामध्ये केलेली पूजा ही फलदायी ठरणार आहे. 


नवमी तारीख 2023 (Navami 2023 Date )


चैत्र नवरात्रीमध्ये 30 मार्च 2023 ला नवमी साजरी केली जाणार आहे. याला महानवमी असंही म्हणतात. या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. चैत्र शुक्ल नवमी तिथी 29 मार्च 2023 ला रात्री 9:07 वाजता सुरू होईल आणि 30 मार्च 2023 ला रात्री 11:30 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार नवमी 30 मार्चला साजरी केली जाणार आहे. 


 शुभ योग (Chaitra Navratri Navami Shubh Yoga) 


या नवमीला चार शुभ योगांचा संयोग होत आहे. नवमी तिथीला गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग असतील. त्यावर सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग दिवसभर ठेवल्याने संपूर्ण दिवस हवन-कन्या पूजनासाठी शुभ राहील. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)