Chanakya Niti For Happy Married Life: असं म्हणलं जातं, नात्यामध्ये काहीही लपवून ठेवू नये. खासकरून पती-पत्नीच्या नात्यांमध्ये कोणतीही गोष्ट लपवून ठेऊ नये, असं सांगण्यात येतं. मात्र चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पतींनी आपल्या पत्नीपासून काही गोष्टी गुपित ठेवल्याचं पाहिजेत. असं न केल्यास त्यांना येणाऱ्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी व्यक्तीच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टींचा समावेश आपला ग्रंथ नीती शास्त्र यांच्यात केला आहे. चाणक्यांनी आपल्या आयुष्याशी संबंधित व्यावहारिक ज्ञान आणि याबाबची धोरणं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. याशिवाय चाणक्य नीतीमध्ये स्त्री-पुरुष संबंधांसोबत त्याच्या गुणांसंदर्भात माहिती दिलीये. यानुसार जाणून घेऊया, चाणक्यांच्या मते पतीने पत्नीपासून कोणत्या गोष्टी लपवून ठेवल्या पाहिजेत. 


तुमचं विकनेस


आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, पतीने कधीही तुमची कमजोरी काय आहे, याबाबत पत्नीला कधीही सुगावा लागू देऊ नये. पतीने नेहमी स्वतःच्या कमजोरीला स्वतःपर्यंतच ठेवलं पाहिजे. चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे की, जर पत्नीला पतीच्या विकनेसबद्दल समजलं तर ती त्याचा उल्लेख सतत करू शकते. म्हणूनच पतीने कधीही कमजोरी कोणाला सांगू नये. असं केल्याने जर कधी नात्यात वाद निर्माण झाला तर पत्नी याचा उल्लेख करण्याची शक्यता असते. 


पगार


आजकाल अनेकजण आपला पगार शक्यतो कोणाला सांगत नाहीत. असंच पतीनेही पत्नीही कधीही आपल्या कमाईविषयी संपूर्ण माहिती देऊ नये. जर पत्नीला पतीच्या पगाराविषयी माहिती मिळाली तर ती त्याला खर्चाच्या बाबतीत अनेक प्रश्न करू शकते. यावेळी पती काही खर्च करत असेल तर पत्नी त्याला रोखण्याचा प्रयत्न करू शकते. अशावेळी या गोष्टींचा परिणाम तुमच्या दररोजच्या जीवनावर देखील पडण्याची शक्यता आहे. 


तुमच्या अपमानाबाबत


जर कधी आयुष्यात तुमचा कोणीही अपमान केला असेल तर ही गोष्ट कधीही तुमच्या पत्नीला सांगू नका. चाणक्यांनी नीती शास्त्रांमध्ये याचा उल्लेख केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी पती आणि पत्नीमध्ये कोणत्या गोष्टीवरून वादाची ठिणगी पडते, त्यावेळी पत्नी दुसऱ्याने केलेल्या अपमानाची आठवण महिलांना करून देतात. यावरून पत्नी तुम्हाला टोमणे देखील मारू शकतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग असतील, तर तो पत्नीला सांगू नये.


तुम्ही दान केलं असेल तर


असं म्हटलं जातं की, तुम्ही जे काही दान करता त्याबद्दल कोणालाच सांगू नये. चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर पतीला काही दान करायचं असेल तर पत्नीला कधीही याबद्दल सांगू नये. अशावेळी पत्नी पतीला दन करण्यापासून रोखण्याची शक्यता असते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)