मुंबई : प्रत्येकाला आयुष्यात पैशांची गरज भासते. पैसे कमण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करतो. पण कमाईसोबतचं बचत देखील तितकीचं महत्त्वाची असते. कारण जेव्हा जीवनात कठीण काळ येतो, तेव्हा बचत आपल्याला आधार देते. चाणाक्य सागंतात. बचत अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून कायम लक्षात ठेवा वायफळ खर्च करण्यापेक्षा बचत करण्याला अधिक प्राधान्य द्या. चाणक्य नितीमुळे आपल्याला आयुष्यात किती यश मिळू शकते, त्यांच्या शिकवणीच्या मदतीने तुम्ही आयुष्यात पैसे कमवू शकता आणि बचत देखील करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- चाणक्य मानतात ही, प्रत्येकाने महिन्याला कमावलेले पैसे वाचवले पाहिजेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आर्थिक त्रास होणार नाही. म्हणूनच ते म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने आपला व्यवसाय आणि नोकरी करत कमावलेल्या पैशांची बचत केली पाहिजे.


- लोकांनी गरजू लोकांना मदत करावी. चाणाक्य सांगतात प्रत्येक व्यक्तीने बचत आणि गुंतवणूक केली पाहिजे, परंतु बचत करताना पैसे दान देखील केले पाहिजेत. त्यामुळे लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्ही गरीब आणि गरजू लोकांना पैसे दान करू शकता


- अशा ठिकाणी काम करायला हवं ज्यामुळे पुढे जावून आपल्याला फायदा होईल. योग्य ठिकाणी काम आणि व्यवसाय करूनच माणूस आयुष्यात प्रगती करू शकतो. विचार करुण काम केल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती आयुष्यात कधीही डगमगणार नाही. 


- चाणक्य सांगतात की जर तुम्ही पैसे कमावले तर बचतही करावी. जर तुम्ही पैसे वाचवले नाहीत तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. गरजेच्या वेळी कोणीही तुम्हाला मदत करणार नाही. त्यावेळी तुमची बचत तुमच्यासाठी कठीण काळात उपयोगी पडेल. त्यामुळे वायफळ खर्च करु नका. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)