मुंबई : पती-पत्नीमध्ये प्रेम आणि आदर असेल तरंच कुटुंबात आनंद नांदतो. कोणत्याही नात्यामध्ये प्रेम आणि आदर आत्यंत महत्त्वाचा असतो. पण कुटुंब सुखी, सुसंस्कृत आणि समृद्ध करण्यात महिलांचा मोठा वाटा असतो. घरातील स्त्रीमध्ये काही विशेष गोष्टी असतील तर घर स्वर्गासारखे बनते, म्हणून पत्नीला लक्ष्मीचे रूप म्हटले जाते. चाणक्य नीतीमध्ये स्त्रीची अशी काही वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे पतीचं आयुष्य फुलून जातं. पण यामध्ये पतीची देखील साथ अत्यंत गरजेची असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुसंस्कृत आणि सुशिक्षित स्त्री 
स्त्री सुशिक्षित, सुसंस्कृत असेल तर संपूर्ण कुटुंब चांगल्या वातावरणात तयार होतं. अशा कुटुंबातील नवीन पिढी सुसंस्कृत आणि चांगली होते. सुसंस्कृत स्त्रीच आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकते. स्त्री जर धार्मिक असेल, तर अत्यंत उत्तम. 


शांत स्वभावाची स्त्री
प्रत्येक व्यक्तीने रागावणे आणि भांडणे टाळले पाहिजे. पण विशेषतः पत्नी शांत स्वभावाची असेल तर घरात नेहमी सुख-शांती नांदते. शांत आणि आनंदी स्वभावाची स्त्री घराला सकारात्मकतेने भरते. ती सर्वांना प्रेम आणि आदर देते. अशा स्त्रीशी लग्न करणारी व्यक्ती खूप भाग्यवान असते.


धीर आणि समजदारपणा


आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येत जात राहतात, पण जर पतीच्या वाईट दिवसांत ठामपणे उभी राहणारी स्त्री जोडीदाराचं नशीब फुलवून टाकते. पतीला कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यास मदत करते.