Chanakya Niti : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चाणक्य नीतीचा अवलंब केला पाहिजे. त्यासाठी दिवसाची सुरुवातही काही चांगल्या कामाने करणे आवश्यक आहे. तसेच चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले आहे.  दिवसाची सुरुवात चांगली असेल तर दिवसभरातील सर्व कामात यश मिळते असे सांगितले गेले आहे. दिवसाच्या शुभ सुरुवातीसाठी, काही गोष्टींचे पालन केले पाहिजे, तरच जीवनात यश येईल आणि व्यक्ती आपले विशिष्ट ध्येय साध्य करु शकेल, असे चाणक्य नीतीत सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दिवसाची सुरुवात चांगली झाली तर दिवसभरातील सर्व कामात यश मिळते. आचार्य चाणक्य म्हणाले की, दिवसाच्या शुभ सुरुवातीसाठी काही गोष्टींचे पालन केले पाहिजे, तरच व्यक्तीला जीवनात यश मिळेल आणि व्यक्ती आपले विशिष्ट ध्येय साध्य करु शकेल. ज्यांना वेळेची किंमत समजते ते आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीत, असा त्यांचा विश्वास आहे. चाणक्यांच्या मते, सकाळ हा दिवसाचा खूप महत्त्वाचा एक टप्पा आहे, तो व्यर्थ जाऊ देऊ नका. रोज सकाळी उठल्यावर चाणक्यांच्या या चार गोष्टींचे पालन केल्यास यश मिळते, असे चाणक्य नीतीत म्हटलेय.


1. सकाळी लवकर उठणे - सकाळी लवकर उठण्याची सवय चांगली असते. जास्त वेळ झोपणे आरोग्य आणि करिअर या दोन्हीसाठी हानिकारक आहे. चाणक्य म्हणतात की लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे. सकाळी लवकर उठल्याने काम वेळेवर पूर्ण होण्यास मदत होते.


2. नियोजन हवे - चाणक्य नीतीनुसार , सकाळी उठल्यानंतर संपूर्ण दिवसाचे नियोजन केले पाहिजे. जी व्यक्ती आपल्या संपूर्ण दिवसाचे नियोजन करते ती व्यक्ती आपले ध्येय गाठते. हे ध्येय काठताना त्यांना कोणतीही अडचण येत नाही. तसेच काम करणे सोपे होते. त्यामुळे वेळ वाया जात नाही आणि सर्व कामे वेळेवर पूर्ण होतात.


3. वेळेचे व्यवस्थापन हवे - वेळ खूप मौल्यवान आहे. त्यामुळे हुशारीने वेळेचा उपयोग केला पाहिजे. तयार केलेल्या नियोजनानुसार सर्व काम वेळेवर पूर्ण करावीत, असे चाणक्य सांगतात. उद्यापर्यंत कोणतेही काम पुढे ढकलू नका. असे करुन यश मिळू शकत नाही. जर तुम्हाला स्वप्नांना अर्थपूर्ण बनवायचे असेल, तर वेळापत्रकाचे अनुसरण करा, ते केवळ यशच नाही तर संपत्ती, प्रतिष्ठा आणि सन्मान देखील देईल.


4. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायाम करा - चाणक्य नीतीत सांगितले आहे की, आरोग्याशी कधीही तडजोड करु नका. कारण जर तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहिलात तर रोग तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. आजारी व्यक्ती इच्छा असूनही आपले ध्येय साध्य करु शकत नाही. शरीरात ऊर्जा असेल तेव्हाच ते काम करु शकता. त्यामुळे रोज योगा करा, व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञान आणि धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)