Chanakya Niti About Money: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आपल्या नीतिशास्त्रात मानवी जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या धोरणांमध्ये ज्ञानाचा अद्भूत भांडार दडलेले आहे. त्यांची धोरणे आणि शब्द पूर्वीच्या काळात जितके प्रभावी होते तितकेच आजही प्रभावी आहेत. ज्यांनी त्यांच्या धोरणांचे पालन केले त्यांनी जीवनात यश मिळवले. आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या आर्थिक जीवनापासून ते वैवाहिक जीवनाविषयीही सांगितले आहे. त्यांची ही धोरणे अनेक प्रकारच्या संकटांवर रामबाण उपाय मानली गेली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच काय तर आचार्य चाणक्य यांना हे इतिहासातील एक महान मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी आहेत. यासोबतच त्यांना उत्तम शिक्षक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनासंबंधी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग सांगतात. आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन केल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल. या चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसे माणसाला श्रीमंतीकडे नाही तर गरीबीकडे नेतो. चाणक्यनीती नुसार चुकीचा पद्धतीने कमावलेले पैसे तुम्हाला गरिबीकडे कसे घेऊन जाते हे आज जाणून घेऊया. 


1. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, जो व्यक्ती चोरी, जुगार, अन्याय आणि चूकिच्या पद्धतीनं पैसे कमावतो ते पैसे त्याच्यासोबत अधिक काळ टिकत नाही आणि लवकरच  कोणत्या ना कोणत्या मार्गाने नष्ट होतो.


2. पैसा कमावण्यासाठी कधीही कोणत्या व्यक्तीवर अत्याचार करू नये. अशा प्रकारे कमावलेला पैसा तुमच्याकडे टिकणार नाही. कारण ज्याच्यावर अत्याचार करून तुम्ही पैसे कमवत आहात ती व्यक्तीदेखील तुम्हाला कधीच सुखी राहण्याचा आशीर्वाद देणार नाही व त्याचे श्राप कायम तुमचा पाठी राहतील. 


हेही वाचा : Anushka Sharma चा भाऊ कर्णेश करतोय 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला डेट?


3. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्र चाणक्य नीतीमध्ये असेही म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने पैसे कमवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर केला तर तो पैसा त्याला श्रीमंत होण्याऐवजी गरीब बनवतो. अशी संपत्ती फार काळ टिकत नाही आणि काही ना काही कारणाने ती लवकर निघून जाते.


4. चाणक्य नीतीनुसार, मनुष्य जे पेरतो त्या प्रमाणेच फळ त्याला मिळते. त्यामुळे जर तुम्ही कोणाची फसवणूक करून पैसे कमावले तर तो पैसा तुम्हाला आयुष्यात कधीच सुख आणि आनंद घेऊ देणार नाही. म्हणूनच माणसाने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)