Chanakya Niti : पत्नीला कधीच नका सांगू `या` गोष्टी; समस्त `नवरे`बुवांनी लक्षपूर्वक पाहा
Chanakya Niti : बोलण्याच्या नादात तुम्हीही पत्नीला काही अशा गोष्टींची माहिती देऊन जाता जी दिली जाणं अपेक्षित नसतं. आता पती पत्नीच्या नात्यात नेमकं लपवून तरी काय ठेवायचं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आधी हे वाचा...
Chanakya Niti About Husband And Wife: काही व्यक्ती इतक्या विद्वान असतात, की त्यांचा शब्द अनेकदा प्रमाण ठरतो. त्यांना भविष्य, भूतकाळ आणि वर्तमानाविषयी असे काही संकेत मिळतात की, इतरांना त्या गोष्टींचा अंदाजही येत नाही. अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे आचार्य चाणक्य. अनेक शतकं मागे गेल्यास आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टींविषयी भाष्य केलं होतं ज्या 21 व्या शतकातही लागू असल्याचं लक्षात येतं.
राजकारण, समाजकारण, शास्त्र, वेद, नातेसंबंध, शिक्षण अशा अनेक गोष्टींबाबत चाणक्य यांनी त्यांचे विचार मांडले. समाजाला मार्गदर्शन केलं. नीति शास्त्र नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांनाच योग्य मार्ग दाखवला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण आचार्यांनी चक्क पती- पत्नीच्या नात्याविषयीसुद्धा अशा गोष्टी सांगितल्या ज्यामुळं नात्यात कलह होणार नाही. तुम्ही वेळीच सावध व्हाल. (Chanakya Niti Husband shouls hide salary and other things from Wife)
हेसुद्धा वाचा : Angaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका 'ही' कामं
पती-पत्नीच्या नात्यात कोणतीही गोष्ट लपवली जाऊ नये असं कितीही म्हटलं तरीही चाणक्य नीतिनुसार काही गोष्टी याला अपवाद आहेत. पतीनं काही गोष्टी पत्नीला न सांगणंच उत्तम.
पगाराचा खरा आकडा (Salary)
चाणक्त नीतिच्या नियमांनुसार (Chanakya niti rules) पतीनं कधीही पत्नीला आपल्या पगाराचा खरा आकडा सांगू नये. पतीनं संपूर्ण पगार सांगितल्यास पत्नी त्यावरही आपला हक्क समजू लागते आणि पतीचे खर्च नियंत्रिक करू पाहते. हे नात्यासाठी योग्य नाही.
कोणा एका गरजवंताला दान
आपण कोणाला मदत म्हणून किती पैसे दिले, किती दान केलं, कुठे किती खर्च केला हेसुद्धा पत्नीला न सांगितलेलं उत्तम. दान करून त्याची चर्चा केल्यास त्या दानाचं फलित तुम्हाला मिळणार नाही. (Chanakya Niti for Husband and Wife)
पडती बाजू
पत्नीसमोर पुरुषांनी/ पतीनं कधीच त्यांची पडती बाजू मांडू नये. अनेकदा असं होतं की पत्नीला ही माहिती मिळाल्यास ती याचा गैरफायदाही घेऊ शकते. यामुळं तुम्हाला चारचौघांमध्ये अपमानाचं धनीसुद्धा व्हावं लागू शकतं.
फजितीविषयी नका सांगू
एखाद्या प्रसंगी तुमची कुठं फजिती झाल्यास पत्नीला याविषयी न सांगणं उत्तम. नकळत एखाद्या प्रसंगी पत्नीसुद्धा तुमची खिल्ली उडवून तोच मुद्दा पुन्हा प्रकाशात आणू शकते. इथं स्वाभिमान दुखावला जाण्याची दाट शक्यता असते.
(वरील माहिती सर्वसामान्य मान्यता आणि उपलब्ध संदर्भांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)