मुंबई : महान विद्वान आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) मानवी जीवनाविषयी अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीनं आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या चाणक्य नीतीचे पालन केले तर त्याला जीवनात नक्कीच यश मिळते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये विविध प्राणी आणि पक्षी आणि त्यांच्या गुणांबद्दल देखील सांगितले आहे. आचार्य चाणक्य म्हणाले की, मानव, प्राणी आणि पक्षी यांच्यातील काही विशेष गुण अंगीकारले पाहिजेत. त्यांनी यशस्वी होण्यासाठी प्राण्यांचे काही गुण सांगितले आहेत. तर हे गुण कोणते आहेत हे जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोंबड्याकडून काय शिकाल ?


चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी सांगितले की कोंबड्याप्रमाणे माणसाने सूर्योदयापूर्वी उठायला पाहिजे. याशिवाय, कोंबडा लढाईत कधीही मागे हटत नाही आणि धैर्याने लढतो. कोंबड्याचे हे गुण शिकले पाहिजेत. याशिवाय व्यक्तीने कोंबडीप्रमाणे कुटुंबात वाटून खावे.


बगळ्याकडून स्वत: वर ताबा ठेवण्यास शिका


आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्याने बगळ्यापासून स्वत: वर ताबा ठेवण्याचा गुण शिकला पाहिजे. बगळा लक्ष केंद्रित करण्यात माहिर असतो. मानवानेही आपल्या इंद्रियांवर बगळ्याप्रमाणे नियंत्रण ठेवावे आणि कोणतेही काम तुमच्यात असलेल्या शक्तीनुसार करावे.


कावळ्यासारखे सावध रहा


कावळा हा असा पक्षी आहे जो सदैव सावध असतो. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीने कावळ्याचा हा गुण शिकला पाहिजे. याशिवाय कावळ्याकडून पूर्ण इच्छाशक्तीने प्रयत्न करायला शिकले पाहिजे.


सिंहासारखं करा तुमच्या शक्तीचा उपयोग 
आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्यानं सिंहाप्रमाणे सर्व काही पूर्ण शक्तीनं केलं पाहिजे. सिंह हा असा प्राणी आहे जो आपल्या शिकारावर पूर्ण ताकदीनं हल्ला करतो. मानवानेही यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत. (chanakya niti if you adopt these qualities of from lion to cock enemy will tremble) 


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)