Chanakya Niti : वाईट काळात दुसऱ्यांना मदत करणे याला माणुसकी म्हणतात, माणुसकी तीच असते, जी वाईट प्रसंगी पण शत्रूला पाणी देण्यास मदत कधीच नकार देत नाही. आचार्य चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने कोणताही निर्णय हा वेळ, परिस्थिती, धर्म लक्षात घेऊनच घ्यावा. तसेच संकटात अशा लोकांची मदत कधीच मागू नका, ज्यांना शत्रूपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते... 


या लोकांकडून चुकूनही मदत मागू नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संकटात अशा लोकांची मदत मागू नका: संकटात अशा लोकांची मदत कधीच मागू नका, ज्यांना शत्रूपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते. आचार्य चाणक्यांच्या मते, जे चांगुलपणाचा मुखवटा धारण करतात. मात्र तेच लोकं एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे वार करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.


ईर्ष्या: ज्या व्यक्तीच्या मनात ईर्ष्याची भावना असते, ती माणसे स्वतःची प्रगती करत नाही, ते इतरांनाही प्रगती करू देत नाही. चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीला तुमचा हेवा वाटतो, त्याच्यासमोर वाईट काळातही हात पसरवू नका. 


वाचा: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार? 


स्वार्थी व्यक्ती: जो माणूस फक्त स्वतःच्या हिताचा विचार करतो, जो नेहमी स्वत:चा फायदा कसा होईल याचा विचार करतो, त्याने कधीही अशा लोकांची मदत घेऊ नये. कारण असे लोक स्वार्थापोटी तुम्हाला पाठिंबा देतात, परंतु त्यांचा स्वार्थ ते कधी साधून घेतील हे देखील कळणार नाही. 


गरज पडल्याच या लोकांची मदत घ्या: आचार्य चाणक्य सांगतात की, जर तुम्हाला आयुष्यात कधी कोणाच्या मदतीची गरज भासली तर सर्वात आधी तुमचे कुटुंबातील सदस्य किंवा जवळीक मित्र यांना सांगा. कारण कितीही वाईट वेळ असली तरी अशा लोकांची मदत घ्यायला विसरू नका जे तुम्हाला वेळोवेळी केलेल्या मदतीची जाणीव करून देतात.


रागीष्ट व्यक्ती: कितीही वाईट वेळ असली तरीही रागीष्ट व्यक्तींकडे मदतीचा हात मागू नका. कारण रागावर नियंत्रण ठेवता येत नाही अशा व्यक्तीची मदत कधीही घेऊ नका. असे लोक कठीण काळात तुमची समस्या आणखी वाढवू शकतात.


 


 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)