Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य हे भारतातील खूप मोठे विद्वान होते. ते चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरुदेखील होती. त्यांनी दिलेल्या उपदेशांचे चंद्रगुप्त मौर्य यांनी पालन केल्याचाही उल्लेख आढळतो. चाणक्य यांनी नीति शास्त्रची रचना केली. ज्याला चाणक्य निती या नावाने ओळखले जाते. चाणक्य नितीत सांगितलेल्या उपदेशाचे पालन केल्यास त्या व्यक्तीला यशस्वी होण्यास कोणीच रोखू शकत नाही. चाणक्य नीती व्यक्तीला योग्य आणि अयोग्य याचा आरसा दाखवण्यास मदत करते. ज्यामुळं त्याला कधीच धोका मिळू शकत नाही आणि आयुष्यात नेहमीच यश मिळेल. चाणक्य नितीनुसार एखाद्या व्यक्तीवर संकट आले तर त्यावेळी त्याने कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी व कुठे लक्ष द्यायला हवे, याबाबत सांगितले आहे. 


सावध राहा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य चाणक्य यांच्यानुसार एखाद्या व्यक्तीला संकटकाळात नेहमीच सावध राहायला हवे. संकटकाळात व्यक्तीसोमर समस्यांचा डोंगर असतो पण त्यावर मार्ग खूप कमी असतात. अशावेळी त्या व्यक्तीकडून करण्यात आलेली छोटीशी चूकही मोठी अडचण निर्माण करु शकते. 


कुटुंबीयांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या


चाणक्य नितीनुसार, प्रत्येक व्यक्तीचे पहिले कर्तव्य हे संकटकाळात आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणे. कुटुंब सुखरुप असेल तर त्यातून आरामात त्या संकटातून बाहेर निघू शकतो. त्यामुळं तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही विशेष सुरक्षा घ्यायची गरज आहे. 


आरोग्याकडे लक्ष द्या 


आचार्य चाणक्य यांच्यानुसार, आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीसाठी सगळ्यात मोठी जमापुंजी असते. त्यामुळं आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. जर तुमचे आरोग्य ठणठणीत असेल तर तुम्ही संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करु शकतात आणि संकटातून मुक्त होऊ शकतात. त्यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्याही आरोग्यशाली असणे खूप गरजेचे आहे. 


पैशांची बचत करा


आचार्य चाणक्य यांच्यानुसार, मनुष्याला संकटकाळात त्याच्याकडे असलेली संपत्ती व पैशांची बचत केली पाहिजे. जर त्या व्यक्तीकडे पुरेसे धन उपलब्ध नसेल तर खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. पण जर तुमच्याकडे पुरेसे धन असेल तर त्या परिस्थितीतून तुम्ही सहज मार्ग काढू शकता. आचार्य चाणक्य यांच्यानुसार संकटकाळात पैसाच व्यक्तीचा सख्खा मित्र असतो. तसंच, ज्या व्यक्तीकडे पैशांची कमतरता किंवा अभाव असेल तर त्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अनेक कठिण परिस्थितींचा सामना करावा लागतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)