Chanakya Niti: आयुष्यात अनेक चांगले वाईट दिवस येतात, पण या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आणि आपली वागणूक कशी असालया हवी... याबद्दल चाणाक्य नीतिमध्ये (Chanakya Niti) उत्तमप्रकारे लिहिली आहे. एवढंच नाही तर, आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) स्त्री आणि पुरुषांच्या स्वभावाबद्दल देखील अनेक गोष्टी नीति शास्त्र (Niti Shastra) या ग्रंथामध्ये लिहिल्या आहेत. या ग्रंथामध्ये सांगितले आहे की, महिलांमध्ये असे चार गुण असतात, ज्यामध्ये पुरुष त्यांना कधीही हरवू शकत नाही. महिलांचे ते 4 गुण कोणते आहेत ते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 .  नीति शास्त्रात आचार्य चाणक्य सांगतात की स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धैर्यवान असतात. महिला कोणत्याही वाईट परिस्थितीला खंबीरपणे तोंड देऊ शकतात. आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्री पुरुषापेक्षा 6 पट अधिक धैर्यवान असते. संकटाची वेळ आली की स्त्रीची हिंमत समोर येते.


2. आचार्य चाणक्य म्हणतात की स्त्रिया त्यांच्या स्वभावाने हळव्या असतात आणि पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची त्यांच्यात क्षमता आहे. हा गुण त्यांच्यामध्ये नैसर्गिक आहे. वयानुसार महिला अनुभवानूसार पुढच्या पिढीला मार्गदर्शन करत असतात.  (Chanakya Niti Quotes)


3. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त भावनिक असतात. पण ही त्यांचा हा कमकुवतपणा नसून त्यांची आंतरिक शक्ती आहे, ज्यामुळे महिला प्रत्येक परिस्थितीत आपले अस्तित्व टिकवून ठेवतात.  (Religion News)


4.  पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक भूक लागते. याचं कारण त्यांची शारीरिक रचना आहे, ज्यामुळे त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी अधिक कॅलरीजची आवश्यकता असते. यामुळेच महिलांना पोटभर आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. (Chanakya Niti said about woman)