Wife-Husband Luck : कोणतंही नातं प्रेम (love), विश्वास (trust), आदर (respect) या गोष्टींवर अधारित असतो. त्यामुळे नात्यामध्ये विश्वास असेल प्रेमची भावना आपसून तयार होते आणि समोरच्या व्यक्तीबद्दल आदर वाटतो. पती-पत्नीच्या (Wife-Husband Luck) नात्याची व्यख्या विश्वासापासून होते. त्यानंतर प्रेम आणि आदर... पत्नीच्या सहवासामुळे घराला घरपण येतं. कुटुंब सुखी, सुसंस्कृत आणि समृद्ध करण्यात महिलांचा मोठा वाटा असतो. घरातील स्त्रीमध्ये काही विशेष गुण असतील तर घर स्वर्गासारखं बनतं, म्हणून पत्नीला लक्ष्मीचं रूप म्हटलं  जातं. आज जाणून घेवू चाणाक्य नीतिमध्ये (chanakya niti) पत्नीच्या कोणत्या  चार महत्त्वांच्या गुणांबद्दल सांगितलं आहे. (Best Life Partner)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धीर आणि समजदारपणा : प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येत जात राहतात, अशा परिस्थितीत जवळची माणसं सोडूण जातात. पण जर पतीच्या वाईट दिवसांत ठामपणे उभी राहणारी स्त्री जोडीदाराचं नशीब फुलवून टाकते. पतीला कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यास मदत करते. (Lucky Wife for Husband)


सुसंस्कृत आणि सुशिक्षित स्त्री : अन्न, वस्त्र, निवारा यासोबतचं शिक्षण काळाची गरज आहे. स्त्री सुशिक्षित, सुसंस्कृत असेल तर संपूर्ण कुटुंब चांगल्या वातावरणात तयार होतं. अशा कुटुंबातील नवीन पिढी सुसंस्कृत आणि चांगली होते. सुसंस्कृत स्त्रीच आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकते. स्त्री जर धार्मिक असेल, तर अत्यंत उत्तम. 


शांत स्वभावाची स्त्री : राग माणसाला विनाशाच्या दिशेने घेवून जातो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शांत स्वभाव फायद्याचा ठरतो. त्यामुळे पत्नी शांत स्वभावाची असेल तर घरात नेहमी सुख-शांती नांदते. शांत आणि आनंदी स्वभावाची स्त्री घराला सकारात्मकतेने भरते. ती सर्वांना प्रेम आणि आदर देते. अशा स्त्रीशी लग्न करणारी व्यक्ती खूप भाग्यवान असते. (perfect life partner)


बचत करणारी स्त्री :  प्रत्येक कुटुंबासाठी बचत फार महत्त्वाची असते. जी महिला कठीण वेळेसाठी पैसे बाजूला ठेवते, अशा स्त्रीयांचे पती फार नशीबवान असतात. (how to choose life partner)
(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)