Chanakya Niti: तब्येतीचं नो टेन्शन! नीतिशास्त्रातील चाणक्य यांच्या या बाबी लक्षात ठेवा
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अनेक बाबींचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी नीतिशास्त्रात लिहिलेल्या बाबी आजही तंतोतंत लागू होतात.
Chanakya Niti For Healthy Life: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अनेक बाबींचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी नीतिशास्त्रात लिहिलेल्या बाबी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राबाबत कायम उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांनी सुखी जीवनासाठी अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात मांडल्या आहेत. जर एखादी व्यक्ती आजारी असेल, तर सर्व काही मिळवूनही त्याचे संपूर्ण आयुष्य व्यर्थ जाते. परंतु एक निरोगी व्यक्ती त्याच्या सर्व कामांमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचते. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल आणि रोगांपासून दूर असेल तर तो त्याच्या प्रत्येक गोष्टीत यश संपादन करतो.
चांगले आरोग्य मिळवण्यासाठी चाणक्य यांनी तीन उपाय सांगितले आहेत. जर या बाबी लक्षात ठेवल्या तर आपले शरीर देखील रोगमुक्त होईल आणि माणूस प्रगतीच्या पायऱ्या चढेल. चला तर मग जाणून घेऊयात या तीन बाबी कोणत्या आहेत.
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम् भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्
आचार्य चाणक्य या श्लोकाद्वारे स्पष्ट केलं आहे की, जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे, यामुळे शरीराला अधिक शक्ती मिळते. जेवणाच्या दरम्यान थोडेसे पाणी पिणे हे अमृतसारखे आहे. पण अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.
राग बढत है शाकते, पय से बढत शरीर घृत खाये बीरज बढे, मांस मांस गम्भीर
चाणक्य यांनी या श्लोकात म्हटले आहे की, काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आजार वाढतात. दुसरीकडे दुधाचा आहारात समावेश केल्यास शरीर मजबूत होते. तुपाच्या सेवनाने वीर्याचे प्रमाण वाढते. मांसाहारही शरीरासाठी अपायकारक आहे.
गुरच औषधि सुखन में भोजन कहो प्रमान चक्षु इंद्रिय सब अंश में, शिर प्रधान भी जान
आचार्य चाणक्य यांनी या श्लोकाद्वारे सांगितले आहे की, औषधांमध्ये गुरच म्हणजे गिलोय शीर्षस्थानी आहे. सर्व सुखांमध्ये अन्न मिळाल्याचा आनंद हाच परमोच्च आहे. अन्न खाण्यात जे सुख मिळते ते कुठेच मिळत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)